Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैभव तत्ववादीबद्दल काही रंजक गोष्टी…
Happy Birthday Vaibhav Tatwawadi: उत्तम अभिनयशैली आणि स्मार्ट पर्सनालिटी तसेच खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav tatwawaadi). आज त्याचा वाढदिवस. (Social media) वैभव हा ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘सर्किट’ यांसारख्या अनेक वेगवगळ्या मराठी सिनेमांमध्ये त्याने चाहत्यांना आपली कला दाखवली आहे. मराठीसह वैभवने त्रिभंगा, ‘हंटर’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये देखील तो झळकला आहे. अलिकडेच वैभव ‘कमांडो’ (commando) या सीरिजमध्ये देखील झळकला होता.
View this post on Instagram
या सीरिजमध्ये त्याने केलेल्या कामाचं सध्या सर्वस्तरांमधूम कौतुक केलं जात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आज त्याचा मोठा चाहतावर्ग देखील आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात त्याला फार बोटावर मोजण्या इतकेच मित्र-मैत्रिणी आहेत.परंतु वैभवने अभिनय क्षेत्र करिअर म्हणून निवडलं असलं, तरी तो एक हुशार इंजिनिअर देखील असल्याचे सांगितले जाते. अभिनेता वैभव तत्ववादी हा मूळचा अमरावतीचा आहे. त्याचा जन्म अमरावतीमध्ये झाले. वैभवने नागपूरमधील सोमलवार या शाळेमधून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं आहे.
यानंतर त्याने पुढील शिक्षण पुणे येथे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेटालर्जिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. वैभवला शाळेत असल्यापासून कायमच अभिनयाची आवड असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी अनेकदा दिली आहे. त्याने शाळेत असल्यापासून सतत नाटकांमधून काम करायला सुरुवात केली होती. परंतु तू अगोदर स्वतःचं शिक्षण पूर्ण कर आणि नंतर मनोरंजन क्षेत्रात जाण्याचा विचार कर, असे त्याला त्याच्या वडिलांनी सुनावलं होत. तसेच अभिनयाबरोबरच बॅकअप प्लॅन असावा म्हणून वैभवने इंजिनिअर बनण्याचा स्वप्न बघितला होता.
Parineeti-Raghav Wedding : परिणीती चोप्रा-राघव चड्डा यांनी बांधल्या साता जन्माच्या गाठी…
अभिनयाच्या जोरावर वैभवचं कायम पुण्यामध्ये येणं- जान सुरू झाले होते. पुण्याच्या नाटकाच्या काही ग्रुप्समध्ये त्याला अनेकदा प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती. वैभवच्या हटक्या आणि दमदार अभिनया देखील सर्वत्र त्याचे खूपच कौतुक होत होते. २०१० साली त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि तो अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब चमकवण्यासाठी मुंबईमध्ये आला. वैभवने कायम आपल्या नाटकांमधूनच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
तसेच मुंबईमध्ये आल्यावर काही टीव्ही सिरियलमधून देखील ती काम केल्याचे बघायला मिळाले आहे. परत २०१४ साली ‘सुरज्या’ नावाच्या सिनेमातून तो मोठ्या पडद्यावर झळकला होता. यानंतर त्याने २०१५ मध्ये ‘कॉफी आणि बरंच काही’ या सिनेमात तो मुख्य भूमिकेत बघायला मिळाला होता. तसेच तो त्याच्या सिनेमातून चांगलीच प्रसिद्धी मिळवला आहे.