राज ठाकरे पुन्हा चर्चेत, भर सभेत म्हणाले, मी आज फतवा काढतो अन् …
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवारांसह (Sharad Pawar) मशिदींमधून फतवे देणाऱ्या मौलवींवर निशाणा साधला.
राज ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्यासोबत राहूनही कधीच जातीपातीच राजकारण केलं नाही. माझे त्यांच्याबद्दल अनेक मतभेद असतील मात्र मी जेवढं त्यांना ओळखतो त्यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. 1999 पासून संभाजी पार्कमध्ये हे जातीपातीचं विष पसरवलं गेलं असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाण साधला.
पुढे राज ठाकरे म्हणाले, आम्ही पेटतो जातीपातीच्या विषयांवरुन, तुमच्या याच मासिकतेचा गैर फायदा हे लोक घेत आहेत, आज काय तर म्हणे, मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये काँग्रेसला मतदान करा असे फतवे निघत आहेत. मात्र या देशात अनेक मुसलमान आहेत, ज्यांना अकला आहेत ते ह्यांच्या वाटेला जाणार नाही. आज देशाचा राजकारण कुठे जात आहे हे मुसलमानान समजत आहे. मुस्लीम समाजाला हे फतवे काढणारे काय समजता, ही तुमची घरची गुरं-ढोरं आहेत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. निवडणूक आली की, फतवे काढले जातात काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा असं देखील राज ठाकरे म्हणाले.
जर हे मौलवी मशिंदीमधून फतवे काढून ह्यांना मतदान करा त्यांना मतदान करा असं सांगत असेल तर मी आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… मुरलीधर मोहोळ असतील, भाजपाचे उमेदवार असतील, शिंदेचे आणि अजित पवारांचे उमेदवार असतील त्यांना भरगोस मतदान करा.
छ.संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वी जोरदार राडा; एकमेकांच्या अंगावर जात मनसे अन् ठाकरे गट भिडले
या लोकांची ही जी चुळबुळ सुरु आहे ना काँग्रेसला मतदान करा म्हणून त्याचे कारण, गेल्या 10 वर्षांत ह्यांना तोंड वर काढता आलं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी फतवा काढणाऱ्यांवर निशाणा साधला.