मोदींची शरद पवारांना खुली ऑफर; फडणवीस म्हणाले, ‘मोदींनी ऑफर नाही, तर सल्ला…’

मोदींची शरद पवारांना खुली ऑफर; फडणवीस म्हणाले, ‘मोदींनी ऑफर नाही, तर सल्ला…’

Devendra Fadnavis on PM Modi Offer : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होतील, असे ते म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पवारांच्या या वक्तव्यावर भाष्य करत पवारांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची मोठी ऑफर दिली. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं.

बालवडकर यांचे कार्यालय नागरिकांसाठीचे सेवाकेंद्र : फडणवीस यांच्याकडून कौतुक 

फडणवीसांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मोदींनी दिलेल्या ऑफरविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, मोदींची पवारांना ऑफर नाही, तर सल्ला आहे. बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीये, हे हे जेव्हा पवारांना कळलं, तेव्हा त्यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान केलं. त्यामुळं मोदींनी त्यांना सांगितलं तुम्ही अजित पवारांकडे या आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंकडे यावं. कारण, कॉंग्रेस डुबती नाव आहे. कॉंग्रेस तुम्हाला वाचवू शकत नाही. एनडीएमध्ये आले तरच तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, हा सल्ला मोदींनी पवारांना दिला. ही ऑफर नाही, असं फडणवीस म्हणाले.

छाती फाडली की मरून जाशील स्वतः ला हनुमान समजायला लागला? अजितदादांनी सोनवणेंना भरला दम 

अजितदादांनी पवारसाहेबांसोबत पक्ष मोठा केला. अजितदादांना पक्षात मान्यता होती. आमदार-खासदार त्यांच्यासोबत होते. पण, अजितदादांना प्रत्येकवेळी डावलल्या गेलं. प्रत्येकवेळी त्यांना समोर करायचं अन् तोंडघशी पाडायचं काम पवार साहेबांनी केलं. त्यामुळं आपल्या अस्तित्वाचा विचार करून अजितदादांनी भाजपसोबत येण्याचं काम केलं, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही घर आणि पक्ष फोडण्याच काम करत नाही, असंही फडणवीस म्हणाले. लोकसभेत आम्हाला अपेक्षित जागा मिळतील आणि बारामती देखील आम्हीच जिंकतोय, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube