बालवडकर यांचे कार्यालय नागरिकांसाठीचे सेवाकेंद्र : फडणवीस यांच्याकडून कौतुक
Amol Balwadkar office is a service center for citizens Fadnavis praisedपुणे: प्रशासनाकडे पाठपुरावा करून पाणी पुरवठ्यासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प बाणेर-बालेवाडी परिसरात सुरू करून खऱ्या अर्थाने अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांच्या पाणी प्रश्नाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश आले. परिसरातील प्रत्येकाच्या समस्येवर सातत्याने पाठपुरावा करुन जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाला देखील अमोल बालवडकर यांचा अभिमान आहे. हे कार्यालय नागरिकांसाठी सेवाकेंद्र होईल, असे कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले.
बालेवाडीतील भारती विद्यापीठसमोर, ममता चौक, बालेवाडी हायस्ट्रीट येथे मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाउन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ((Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात झाले. देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच अमोल बालवडकर यांच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून होत असलेल्या विविध विकासकामांचे कौतुक करून जनतेसाठी सुरू केलेल्या या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितच सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील ही सदिच्छा व्यक्त केली.
अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवद्य
तसेच गेली ७ वर्षांपासून सातत्याने बाणेर बालेवाडी परिसरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना परिसरातील पाणी, रस्ते, पथदिवे, कचरा, ड्रेनेज यासारख्या अनेक मूलभूत प्रश्नांबाबत पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्यात त्यांना यश आलेले आहे. स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून अतिशय योग्य रितीने अमोल बालवडकर यांनी बाणेर-बालेवाडी भागाचा निश्चितच कायापालट केला आहे. प्रशासनाकडे पाठपुरावा करुन २४x७ पाणी पुरवठ्यासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प बाणेर-बालेवाडी परिसरात सुरू करुन खर्या अर्थाने अमोल बालवडकर यांच्या पाणी प्रश्नाच्या लढ्याला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. परिसरातील प्रत्येकाच्या समस्येवर सातत्याने पाठपुरावा करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाला देखील अमोल बालवडकर यांचा अभिमान आहे, असे फडणवीस म्हणाले.
Video : धनुभाऊ, पंकजांच्या बीडमध्ये अजितदादांचा हिरमोड; भाषणाला उभं राहताच व्यक्त केली नाराजी
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी, युवावर्ग, मित्रपरिवार, परिसरातील विविध सोसायटींमधील नागरिक तसेच बाणेर- बालेवाडी- सुस- म्हाळुंगे- पाषाण- सोमेश्वरवाडी- औंध मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.