बेरोजगारीची समस्या सोडविणार, पुणेकरांना मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Muralidhar Mohol : पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी पुणे शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन शहरातील बेरोजगारीची समस्या दूर करण्याचे आश्वासन पुणे शहरातील तरुणांना दिले आहे. आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील महात्मा फुले मंडई, खडकमाळ आळी, गाडीखाना, लोहियानगर, मीठगंज पोलीस चौकी, कस्तुरे चौक आणि कृष्णाहट्टी चौक परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, निवडणूक आल्यानंतर शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी एमएसएमई आणि स्टार्टअप क्षेत्राची क्षमता वाढवून देण्यासाठी काम करणार. याच बरोबर पायाभूत सुविधांची निर्मिती, किफायतशीर औद्योगिक वीजदर, स्वतंत्र विमानतळ, मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ, मोक्याची जागा आदी उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी मिळवण्यासाठी देखील सातत्यपूर्ण प्रयत्न करणार असल्याचं देखील ते म्हणाले.
मोहोळ पुढे म्हणाले, सध्या आयटी हबमुळे बांधकाम क्षेत्रापासून ते लॉन्ड्री, मेसपर्यंत अशा व्यवसायांतून रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे असं देखील यावेळी मोहोळ म्हणाले. आज राज्याच्या दरडोई उत्पन्नात 18 टक्के वाटा पुणे शहराचा आहे. यामुळे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं मोहोळ म्हणाले.
विकसित पुण्यासाठी संशोधनाला देणार चालना
आपल्या शहरात आयसर, सी-डॅक, सी-मेट, आयआयटीएम, सीडब्ल्यूपीआर, एनसीएल, एनआयव्ही, एसीसीएस, एनसीआरए, आयुका अशा दोन डझनपेक्षा जास्त संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्था शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. आपण या संस्थांच्या माध्यमातून विकसित पुण्यासाठी संशोधनाला चालना देणार असल्याचे मोहोळ यांनी संगितले.
व्हायरल ऑडिओ क्लीपवर अखेर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाले, धनंजय मुंडेंनी …
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, दीपक मिसाळ, स्वरदा बापट, अजय खेडेकर, विष्णू हरिहर, आरती कोंढरे, सम्राट थोरात, योगेश समेळ, राजेश येनपुरे, संजय देशमुख, राजेंद्र कोंढरे, राजेंद्र काकडे, अमित कंक, चंद्रकांत पोटे, गौरव साइनकर, प्रशांत सुर्वे, निलेश कदम,, गणेश भोकरे, अजय दराडे, कपिल जगताप, प्रमोद कोंढरे, प्रणव गंजीवाले, उमेश चव्हाण, अभिजीत राजपूत, दिलीप काळोखे, उदय लेले, अश्विनी पवार, निर्मल हरीहर, संकेत थोपटे, वैशाली नाईक, निलेश जगताप, नामदेव माळवदे, ईश्ताइक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.