मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यामध्ये मद्यधुंद तरुणाने कार घुसून कट मारला; गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले

Murlidhar Mohol यांच्या सुरक्षेचा ताफा जात असताना भरधाव दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केल्याचा प्रकार शिवाजीनगर येथील संचेती चौकात घडला.

Murlidhar Mohol Held meeting Pune Municipal Corporation and Police Department

पुणे: केंद्रीय मंत्री (Murlidhar Mohol) मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्यामध्ये (कॉन्व्हॉय) मध्ये मद्यधुंद तरुणीने कार घुसून वाहनांना कट मारला. पुण्यात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शुभम विजय वनित या 32 वर्षीय तरुणाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा तरुण पुण्यातील नानापेठ भागातील रहिवासी आहे. पोलिस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.


महाराष्ट्रात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्रे ‘या’ जिल्ह्यात वितरित; स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

रविवारी (13 सप्टेंबर) रोजी रात्री साडेआठ वाजता मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ताफा पुणे विमानतळ येथून कोथरुड येथे जात होता. त्यांच्याबरोबर अंगरक्षक म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक ईश्वर लक्ष्मण भिकुले हे तैनात होते. हा ताफा संचेती पुलावरून स. ग. बर्वे चौकाकडे जात होता. तेव्हा शुभम नवले हा कारचालक ताफ्यामध्ये घुसला. तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शुभम वनित याला कार थांबविण्यास सांगितले. परंतु तो वेडीवाकडी, बेदरकपणे कार चालवत होते. त्याला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. तो थांबला नाहीत. मंत्री मोहोळ यांच्या गाडीला कट मारून तो निघून जात होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले.


‘बाप तो बाप रहेगा’ प्रकरणावरून संजय गायकवाड संतापले; गुन्ह्यामागे 100 टक्के राजकारण

तो वेडीवाकडी गाडी चालवत होता. त्याने मंत्री मोहोळ यांच्या गाडीला कट मारून जात होता. त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आला. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्याच्या नशेष असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) कलम 184, 185 आणि 119/177 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला नोटीस बजावण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक विकास काटे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

follow us