एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेटमध्ये मेगा भरती सुरू, महिन्याला 27,940 रुपये पगार
AIESL Recruitment 2024 : तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या (job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेट (AI Engineering Services Limited) अंतर्गत पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे विमान तंत्रज्ञ (Aircraft Technician) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दरम्यान, या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय? वयोमर्यादा आणि अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे? याच विषयी जाणून घेऊ.
नुकतीच एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेट या पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार याभरतीसाठी आपले अर्ज करू शकतात.
25 जून 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करावे लागणार आहेत.
एकूण जागा – 100 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
पदांचा तपशील
विमान तंत्रज्ञ या पदासाठी एकूण 72 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
तर
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदांच्या एकूण 28 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता-
1. विमान तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एअरक्राफ्ट मेंटेनन्स क्षेत्रातल एएमई डिप्लोमा/प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. किंवा उमेदवाराने संबंधित क्षेत्रातातील अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ पहिल्याच आठवड्यात फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी
2.प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एएमई डिप्लोमा/एअरक्राफ्ट मेंटेनन्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
किंवा उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
वयोमर्यादा
सामान्य/जनरल श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 38 वर्षे आहे.
SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे आहे.
पगार-
विमान तंत्रज्ञ या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास 27,940/- रुपये वेतन दिले जाणार आहे.
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला प्रति महिना रु. 15,000/- वेतन दिले जाईल.
अर्ज फी –
नोकरीचा अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांना रु 1000/- अर्ज शुल्क भरावे लागेल.
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख – 25 जून 2024
अधिकृत वेबसाइट लिंक –
https://www.aisl.in/Default.aspx
अधिसूचना –
https://www.aiesl.in/Doc/Careers/Advertisement-of-Trainee-AT-and-Aircraft-Technician-2024.pdf
अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरीलपैकी कोणत्याही पदासाठी उमदेवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास तो ऑनलाईन पध्दतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा लागले. अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्ज करतांना अर्जात कोणत्याही त्रुटी झाल्यास अर्ज फेटाळल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.