Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ पहिल्याच आठवड्यात फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी

Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ पहिल्याच आठवड्यात फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी

Savi Box Office Collection Day 8: दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) इंडस्ट्रीमध्ये एक चांगली चित्रपट दिग्दर्शिका आहे, परंतु लोकांना तिचा अभिनय आवडत नाही. हे आम्ही म्हणत नसून त्यांच्या चित्रपटांचे कलेक्शन सांगत आहे. आता दिव्या खोसला कुमारचा ‘सावी ए ब्लडी हाऊसवाइफ’ ( Savi A Bloody Housewife ) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. काही काळापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता. (Savi A Bloody Housewife Trailer) ज्याची लोकांनी तोंडभरून कौतुक केले आहे. चला तर मग पहिल्याच दिवशी किती कमाई केली जाणून घ्या…

 

View this post on Instagram

 

A post shared by Divya Khosla Kumar (@divyakhoslakumarfp)


ॲडव्हान्स बुकींगला देखील चांगला प्रतिसाद मिळाला नाही

‘सावी अ ब्लडी हाउसवाइफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय देव यांनी केले आहे. आगाऊ बुकिंग करूनही चित्रपटाने फारशी कमाई केलेली नाही. ‘सावी’बाबत असा अंदाजही वर्तवण्यात आला होता की, पहिल्या दिवशी हा चित्रपट फक्त एक कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करू शकेल. सावीमध्ये दिव्या खोसला कुमारसोबत अनिल कपूरचीही (Anil Kapoor) महत्त्वाची भूमिका आहे.

सावी ओपनिंग डे कलेक्शन

सावीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे तर, सॅकनिल्कच्या मते, दिव्या खोसला कुमारच्या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 13.25 कोटी रुपये कमवले आहेत. अधिकृत आकडे आल्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतात, हा दिव्या खोसलाचा फ्रंट कॅमेरा असलेला दुसरा चित्रपट आहे. याआधी ती ‘यारियाँ 2’ मध्ये दिसली होती. या चित्रपटानेही फारशी कमाई केली नाही.

Savi Box Office: दिव्या खोसलाचा ‘सावी’ तिसऱ्या दिवशीही फ्लॉप? कमावले फक्त इतके कोटी

काय आहे सावीची कहाणी?

सावीच्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात दिव्याचा इंटेन्स लूक पाहायला मिळतो. चित्रपटात दिव्याच्या आयुष्यात एक मोठा अपघात होतो आणि त्यानंतर तिचे आयुष्य बदलून जाते. सावीची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुकेश भट्ट आणि टी-सीरीज यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज