10 लाखांची ओपनिंग अन् कमाई 192 कोटी पार! हनुमान अंश ठरला 2026 चा सरप्राइज ब्लॉकबस्टर

अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हनुमान अंश हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या सरप्राईज हिटपैकी एक ठरला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 11T145354.419

‘Hanuman Ansh’ emerges as the surprise blockbuster of 2026 : निम करोली बाबा यांच्या जीवनापासून प्रेरित असलेल्या हनुमान अंश या भक्तिप्रधान चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड पाचव्या आठवड्यात देखील कायम आहे. विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित आणि शोबिनाव सत्या यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये 35 दिवस पूर्ण केले असून, त्याची भारतातील ग्रॉस कामे अंदाजे 192.75 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या सरप्राईज हिटपैकी एक ठरला आहे. सॅकनीलकच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आपल्या बजेटच्या जवळपास 96 पट कामे केली आहे. भारतातील नेट कलेक्शन सुमारे 163.13 कोटी रुपये आहे. 35 व्या दिवशी देखील चित्रपटाने अंदाजे 10 कोटी रुपयांची कमाई केली, तर पाचव्या रविवारी तब्बल 22.75 कोटी रुपयांची कमाई करत एका दिवसातील सर्वाधिक कलेक्शन नोंदवले आहे.

विशेष म्हणजे हनुमान अंशची सुरूवात अत्यंत साधी झाली होती. 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या 10 लाख रुपयांची कमाई केली होती. पहिल्या दोन आठवड्यात त्याची रोजची कमाई लाखांमध्येच होती. मात्र तिसऱ्या आठवड्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला. 17 व्या दिवशी कमाईने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आणि त्यानंतर चित्रपटाने मागे वळून पाहिलं नाही. 30 व्या दिवशी 16.5 कोटी, तर 32 व्या दिवशी विक्रमी 22.75 कोटी रुपयांची कमाई झाली.

पुण्यात तब्बल 4 ट्रक पनीर आणि खव्याचा साठा जप्त, गणेशोत्सवाआधी FDA ची बुधवार पेठेत मोठी कारवाई

चित्रपटाच्या या अनपेक्षित यशानंतर निर्मात्यांनी आता हनुमान अंशची ट्रिलॉजी करण्याची तयारी सुरू केली आहे. सहनिर्मात्या नम्रता सिंह यांच्या माहितीनुसार ही कथा सुरूवातीपासूनचं तीन चित्रपटांमध्ये मांडण्याची योजना होती. पहिल्या भागात उत्तराखंडमधील कैंची धाम येथील निम करोली बाबा यांच्य सुरूवातीच्या काळावर भर देण्यात आला आहे, तर दुसऱ्या भागात त्यांच्या जीवनातील या कालखंडाच्या अधिक विस्ताराने वेध घेतला जाणार आहे.

तिसरा भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भव्य करण्याची योजना असून, निम करोली बाबा यांच्या अध्यात्मिक विचारांचा जगभरातील प्रभाव दाखवला जाणार आहे. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकेरबर्ग, जॅक डोर्सी आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी जोडल्या गेलेल्या त्यांच्या अध्यात्मिक प्रभावाचा देखील या वेध घेतला जाऊ शकतो.

श्रद्धा, भक्ती, करुणा, प्रेम आणि निस्वार्थ सेवा या मूल्यांवर आधारित हनुमान अंशने अवघ्या 10 लाखांच्या ओपनिंगपासून जवळपास 200 कोटींच्या कमाईपर्यंत मजल मारली आहे. देशांतर्गत यशानंतर होंबले फिल्म्स कडून 11 सप्टेंबरपासून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केला जात आहे.

follow us