Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

Nilesh Lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचा 25 हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव केल्यानंतर सोशल मीडियावर सध्या निलेश लंके चर्चेत आले आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये अहमदनगरच्या विकासाठी पुढील पाच वर्ष काय काय करणार याबाबत आपला प्लॅन सांगितला आहे.

यावेळी निलेश लंके म्हणाले, माझ्या लोकसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. त्यामुळे नगर शहरातील प्रश्न वेगळे असून ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहे. या दोन्ही प्रश्नांना येणाऱ्या काळात सोडवण्याचा प्रत्यन आपण करणार असल्याचं ते म्हणाले. कांद्याची निर्यातबंदी आणि दुधाची दर वाढ हे प्रश्न शेतकऱ्यांबाबतीत आहे तर तरुणांच्या बाबतीत बेरोजगारीचा प्रश्न आहे. यामुळे प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी करण्याचे माझे स्वप्न आहे असं निलेश लंके म्हणाले.

तसेच मतदारसंघातील काही तालुक्यात रस्त्यांचे प्रश्न आहे ते सोडवण्याचे काम देखील येणाऱ्या काळात होणार असं निलेश लंके म्हणाले. संसदेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

तसेच कोणतीही निवडणूक अवघड किंवा सोपी नसते निवडणूक जनतेच्या हातात दिल्याने निवडणुकीत सहज विजय मिळतो, यामुळे लोकसभा निवडणुकीत मला कोणतीही अडचण आली नाही असं देखील लंके म्हणाले.

याच बरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा शब्द दिला होता आणि त्यामूळेच मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असा खुलासा देखील त्यांनी वेळी केला.  आपण इंग्रजी शिकण्याची तयारी सुरु केली आहे.

… तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द

इंग्रजी शिकणं फार अवघड नाही. कोणतीही गोष्ट अवघड नसते म्हणूनच मी लोकसभा निवडणुकीत जिंकून आलो असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज