अठरावी लोकसभा : 78 टक्के ग्रॅज्यूएट, 37 टक्के व्यावसायिक अन् ‘MP’त आठवेळचा एकमेव खासदार

अठरावी लोकसभा : 78 टक्के ग्रॅज्यूएट, 37 टक्के व्यावसायिक अन् ‘MP’त आठवेळचा एकमेव खासदार

Lok Sabha Election Results : देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत आपला निर्णय (Lok Sabha Election Results) देऊन टाकला आहे. देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. देशातील प्रमुख 10 पक्षांचे 479 सदस्य आहेत तर बाकीच्या 31 पक्षांचे फक्त 57 खासदार आहेत. या 543 पैकी 280 खासदार पहिल्यांदाच विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. 116 उमेदवार दुसऱ्यांदा, 74 उमेदवार तिसऱ्यांदा, 35 चौथ्यांदा, 19 पाचव्यांदा, 10 खासदार सहाव्यांदा, सात खासदार सातव्यांदा तर एक खासदार आठव्या वेळेस विजयी होऊन संसदेत पोहोचला आहे.

आठ खासदार पक्ष फोडून विजयी

या निवडून आलेल्यांपैकी 16 खासदार असे आहेत जे आधी राज्यसभा खासदार होते तर 262 खासदार आधीही लोकसभेत होते. म्हणजेच 40 टक्के खासदार पुन्हा निवडून आले आहेत. सन 2019 मधील सतराव्या लोकसभेत 36 राजकीय पक्षांचे उमेदवार विजयी होऊन संसदेत पोहोचले होते. जवळपास 64 टक्के जागा राष्ट्रीय दर्जा असणाऱ्या पक्षांना मिळाल्या आहेत. तर 33 टक्के जागा राज्य पातळीवरील प्रादेशिक पक्षांना मिळाल्या आहेत. फक्त 11 जागा बिगर मान्यताप्राप्त पक्षांना मिळाल्या आहेत.

या सगळ्या खासदारांमध्ये एक खासदार असा आहे जो दोन मतदारसंघात विजयी झाला आहे. तर आठ खासदारांना दुसऱ्या मतदारसंघातून विजय मिळाला आहे. नऊ खासदार असे आहेत जे पक्ष बदलून खासदार झाले आहेत. तर आठ खासदार असे आहेत जे आपला पक्ष फोडून नव्या पक्षातून खासदार झाले आहेत. सरकारमधील 53 मंत्र्यांनी निवडणूक लढली यातील 35 मंत्री जिंकले आणि 18 मंत्री मात्र पराभूत झाले आहेत.

स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू

लोकसभेत 78 टक्के खासदार ग्रज्यूएट

या निवडणुकीत निवडून आलेले 78 टक्के खासदार असे आहेत ज्यांचं शिक्षण पदवी किंवा त्यापेक्षा जास्त झाले आहे. पाच टक्के उमेदवारांनी डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. 22 टक्के खासदार असे आहेत जे महाविद्यालयात गेलेले नाहीत. 48 टक्के उमेदवार समाजसेवक आहे. 37 टक्के शेतकरी, 32 टक्के व्यापारी, सात टक्के कायदा तज्ज्ञ, चार टक्के चिकित्सक, तीन टक्के कलाकार, तीन टक्के शिक्षक तर दोन टक्के उमेदवार सरकारी सेवानिवृत्त आहेत.

मध्य प्रदेशचे वीरेंद्र कुमार आठव्यांदा खासदार

यंदाच्या निवडणुकीत विजयी झालेले सर्वाधिक अनुभवी उमेदवार मध्य प्रदेशातील टीकमगढ येथील भाजप खासदार वीरेंद्र कुमार खटीक आहेत. सलग आठ वेळा निवडणूक जिंकणारे ते एकमेव खासदार आहेत. मध्य प्रदेशात याआधी सुमित्रा महाजन इंदौर येथून आठ वेळा खासदार झाल्या आहेत. परंतु मध्य प्रदेशातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचं रेकॉर्ड कमलनाथ यांच्या नावावर आहे. कमलनाथ नऊ वेळेस निवडून आले होते.

या लोकसभेत दहा पक्ष असे आहेत ज्यांचे दहा किंवा त्यापेक्षा जास्त खासदार आहेत. या सात पक्षांचे 455 खासदार आहेत तर 34 पक्षांचे 81 खासदार आहेत. सतरा पक्ष असे आहेत ज्यांचे फक्त एक-एक खासदार निवडून आले आहेत. दहा प्रमुख राजकीय पक्षांमध्ये भाजप 240, काँग्रेस 99, समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29, द्रमुक 22, तेलुगू देसम 19, जेडीयू 12, शिवसेना यूबीटी 9, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 8, शिवसेना शिंदे गटाचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. या सगळ्या राजकीय पक्षांच्या खासदारांची संख्या 479 आहे. यातील 204 खासदार इंडिया आघडीचे आहेत तर 275 खासदार एनडीए आघाडीचे आहेत.

Modi Cabinet : प्रतापराव जाधव, रक्षा खडसे… नरेंद्र मोदींसोबत कोणते नेते घेणार शपथ? पाहा यादी

द्रमुकचे टीआर बालू सर्वात वृद्ध खासदार

या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांचे सरासरी वय 56 वर्षे आहे. समाजवादी पार्टीचे पुष्पेंद्र सरोज आणि प्रिया सरोज 25 वर्षांचे युवा खासदार आहेत. तर द्रमुकचे टीआर बालू (वय 82) सर्वाधिक वृध्द खासदार आहेत. फक्त 11 टक्के खासदार 40 किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. 38 टक्के खासदार 41 ते 55 वया दरम्यानचे आहेत. 52 टक्के खासदार 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यावेळी तीन खासदार असे आहेत ज्यांचं वय 25 वर्षे आहे.

महिला खासदारांची संख्या घटली

यावेळी निवडून आलेल्या 16 टक्के महिला खासदार 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत. 30 महिला उमेदवार पुन्हा निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभेत 74 महिला खासदार निवडून आल्या आहेत. मागील लोकसभेत 78 महिला खासदार होत्या. ही संख्या चारने कमी झाली आहे. मागील लोकसभेने महिला आरक्षण कायदा केला आहे. त्यानुसार 33 टक्के म्हणजे 180 जागा महिलांना मिळाल्या पाहिजेत मात्र सध्या 14 टक्के जागा महिलांना मिळाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज