IND vs SA Test : आफ्रिकेने बाजी पलटली, इडन गार्डन्सवर भारताचा पराभव

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताला धक्का देत पहिल्या कसोटीमध्ये

  • Written By: Published:
IND Vs SA Test

IND vs SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताला धक्का देत पहिल्या कसोटीमध्ये बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीमध्ये भारताचा 30 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 124 धावांची आवश्यकता होती मात्र भारतीय फलंदाज फ्लॉप ठरल्याने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला. यशस्वी जयस्वाल पहिल्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर के. एल. राहुल देखील बाद झाल्याने भारताच्या अडचणी वाढल्या होत्या. संपूर्ण भारतीय संघ फक्त 93 धावांवरच कोसळला. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरने 92 चेंडूत 31 धावा केल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. सायमन हार्मरने दोन्ही डावात आठ विकेट्स घेतल्या.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी 7 बाद 93 धावांवर खेळ सुरू केला होता. कर्णधार टेम्बा बावुमा वगळता आफ्रिकेचा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही आणि 153 धावांवर कोसळला. टेम्बा बावुमा 55 धावांवर नाबाद राहिला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस, दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 93 धावा (IND vs SA Test) केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडे 36 धावांची आघाडी होती आणि तीन विकेट शिल्लक होत्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाचा हिरो रवींद्र जडेजा होता, त्याने चार विकेट घेतल्या. आफ्रिकेच्या 159  धावांच्या प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 9 बाद 189 धावा केल्या होत्या. मानेच्या दुखापतीमुळे कर्णधार गिल फलंदाजीसाठी आला नव्हता. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 30 धावांची आघाडी मिळाली होती.

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ 1 बाद 37 धावांवर सुरू केला आणि लंचपर्यंत 4 बाद 138 धावा केल्या होत्या. भारताने केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांचे विकेट गमावले. राहुल 39 धावांवर, पंत 27 धावांवर आणि सुंदर 29 धावांवर बाद झाला.

अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…

तर पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्समुळे भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचा संघ 159 धावांवर बाद केला. बुमराहने 14 षटकांत 27 धावा देत पाच विकेट्स घेतल्या तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली.

follow us