राज्य छोटं, काबीज केलं तर केंद्रात सरकार पक्कं; दिल्ली शेजारच्या राज्याची ‘इलेक्शन हिस्ट्री’ही खास!

राज्य छोटं, काबीज केलं तर केंद्रात सरकार पक्कं; दिल्ली शेजारच्या राज्याची ‘इलेक्शन हिस्ट्री’ही खास!

Haryana Lok Sabha Election : देशभरात कडाक्याच्या उन्हाळ्यात निवडणुकांनी वातावरण आणखी तापलं आहे. या रणरणत्या उन्हात प्रचाराचा पारा सुद्धा वाढला आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांचे नियोजन केले जात आहे. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 89 मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर भारतातील हरियाणातील सर्व 10 जागांवर सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यातील सर्व जागा यासाठी महत्वाच्या आहेत कारण असे मानले जाते की जो पक्ष या राज्यात जास्त जागा जिंकतो त्याच पक्षाचे केंद्रात सरकार बनते. मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर हा दावा खोटा ठरत नाही.

हरियाणा राज्यातील मागील 14 लोकसभा निवडणुकांची आकडेवारीवर नजर टाकली तर तब्बल 13 वेळा असेच घडले आहे. हा एक खास योगायोगच म्हणावा लागेल. सन 1967 पासून राज्यात जो पक्ष किंवा आघाडी विजयी होते त्यांचेच केंद्रात सरकार बनते. फक्त 1998 मधील निवडणुकांचा याला अपवाद राहिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने राज्यातील सर्व दहा जागांवर विजय मिळवला होता. तसेच 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपने राज्यातील सात जागा जिंकण्यात यश मिळवले होते. या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश मिळवत केंद्रात सरकार स्थापन केले.

Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती

याआधी 2004 आणि 2009 मध्ये राज्यात काँग्रेस पक्षाने प्रचंड विजय मिळवला होता. या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसने राज्यात 9 जागा मिळवल्या होत्या. तर केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात यूपीए सरकार अस्तित्वात आले होते. इतिहासात आणखी मागे जाऊन पाहिले तर 1996 आणि 1999 मधील निवडणुकांच्या निकालानंतर केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन झाले होते.

1996 मधील निवडणुकीत हरियाणात भाजप आणि हरयाणा विकास पार्टीने सात जागा जिंकल्या होत्या. तर 1999 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इनेलो (इंडियन नॅशनल लोकदल) पक्षाने सर्व दहा जागा जिंकल्या होत्या.

BJP RajyaSabha Candidate : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?

हरियाणात यावेळी भाजप स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत होत आहे. राजकीय जानकारांच्या मते भाजपचे जुने मित्र जेजेपी आणि इनेलो एक किंवा दोन जागांवर खेळ बिघडवण्याच्या स्थितीत आहेत. भाजपने सर्व मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी या दोन्ही नेत्यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.

सर्व मतदारसंघात प्रचार रॅली काढल्या आहेत. धक्कातंत्रात माहीर आलेल्या भाजपने यंदा हरियाणात दहा पैकी सहा ठिकाणी उमेदवार बदलले आहेत. पक्षाने करनाल मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना तिकीट दिले आहे. या व्यतिरिक्त कुरुक्षेत्र मतदारसंघातून नवीन जिंदल, सिरसातून अशोक तंवर, हिसारमधून रणजित चौटाला, अंबालामधून बंटो कटारिया यांना तिकीट दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज