BJP RajyaSabha Candidate : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?

  • Written By: Published:
BJP RajyaSabha Candidate : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Rajya Sabha Election 2024: लोकसभा आणि राज्यसभेच्या उमेदवाराबाबत देशात चांगलंच वातावरण तापलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आरपीएन सिंग (RPN Singh) आणि सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, भाजपने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधूनही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची ही यादी जाहीर केली आहे.

बॅनरवर शाईफेक चुकीचीच, चौकशी झाली पाहिजे; सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात 

आज तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भाजपने आपल्या राज्यसभा उमदेवाराची यादी जाहीर केली आहे. भाजपने सुभाष बराला यांना हरियाणातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांना उत्तराखंडमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. याशिवाय बिहार भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा धरमशीला गुप्ता यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर बिहारमधून पक्षाने नितीश कुमारे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी भीम सिंह यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.

अभिषेकची विश्वासघाताने हत्या, बदनामीचे प्रकार थांबवा; विनोद घोसाळकरांची कळकळीची विनंती 

या वर्षी राज्यसभेचे 68 सदस्य निवृत्त होणार आहेत. यापैकी 3 खासदारांचा कार्यकाळ 27 जानेवारीला संपला आहे, तर इतर 65 सदस्य निवृत्त व्हायचे आहेत. या 65 सदस्यांपैकी 55 सदस्य 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होणार आहेत. तसेच, 7 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 ते 3 एप्रिल दरम्यान पूर्ण होणार असून 2 सदस्य मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. या

निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपच्या खासदारांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा भाजपच्या 32 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. तर काँग्रेसचे 11 खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या 4 आणि बीआरएसच्या 3 खासदारांचा समावेश आहे.

कोणाला मिळाली उमेदवारी?
धरमशीला गुप्ता (बिहार)
डॉ. भीम सिंग (बिहार)
राजा देवेंद्र प्रताप सिंह (छत्तीसगड)
सुभाष बराला (हरियाणा)
नारायण कृष्णासा भांडगे (कर्नाटक)
आरपीएन सिंग (उत्तर प्रदेश)
डॉ. सुधांशू त्रिवेदी (उत्तर प्रदेश)
चौधरी तेजवीर सिंग (उत्तर प्रदेश)
साधना सिंह (उत्तर प्रदेश)
अमरपाल मौर्य (उत्तर प्रदेश)
संगीता बलवंत (उत्तर प्रदेश)
नवीन जैन (उत्तर प्रदेश)
महेंद्र भट्ट (उत्तराखंड)
समिक भट्टाचार्य (पश्चिम बंगाल)

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube