अभिषेकची विश्वासघाताने हत्या, बदनामीचे प्रकार थांबवा; विनोद घोसाळकरांची कळकळीची विनंती

अभिषेकची विश्वासघाताने हत्या, बदनामीचे प्रकार थांबवा; विनोद घोसाळकरांची कळकळीची विनंती

Abhishekh Ghosalkar Murder Case : ठाकरे गटाचे माजी नगरसेवेक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर सत्ताधाऱ्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत. अशातच आता मुलावर केले जाणाऱ्या आरोपांचं खंडन करीत ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी आमच्या बदनामीचे प्रकार थांबवण्याची कळकळीची विनंतीच त्यांनी केली आहे. तसेच माझा मुलगा अभिषेकची हत्या ही विश्वासघाताने केली असून हा मोठा आघात असल्याचं निवेदनच विनोद घोसाळकरांनी केलं आहे.

सोनम कपूरने न्यूयॉर्कमध्ये फॅशन लिजेंड टॉमी हिलफिगरची भेट घेतली…

विनोद घोसाळकर म्हणाले, मी 1982 पासून राजकारणात सक्रिय आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी समाजकारण आणि राजकारण केलेलं आहे. मी आणि माझा मुलगा अभिषेक देखील निरपेक्षपणे निष्ठने काम केलेले आहे. आम्ही शिवरायांच्या विचारांचे पाईक असून निष्कलंक समाजात वावरत आहोत.कोणताही डाग आमच्यावर नसल्याचं विनोद घोसाळकरांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच मी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलो. नंतर विधानसभेवर निवडून गेलो. मुलगा अभिषेक, सून तेजस्वी हेसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आले. जनतेचे प्रेम आणि विश्वास आम्हाला मिळाला. त्याला आम्ही कधीही तडा जाऊ दिला नाही. जनतेची आम्ही नि:स्वार्थपणे सेवा केली, असल्याचं ते म्हणाले आहेत.

हमीभावापेक्षा कमी दर, शेतकऱ्याने कापूस पेटवला; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘हमीभाव मिळेल…’

माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने झालेली हत्या हा आमच्यावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशावेळी अश्लाघ्य असे बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार सुरू आहे. ही बदनामी कृपा करून तत्काळ थांबवा, अशी माझी कळकळीची विनंती आहे असं विनोद घोसाळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही काही गुन्हा केला असेल आणि त्याचे पुरावे असतील तर खुशाल तक्रार नोंदवा, पण खोटेनाटे आरोप सहन केले जाणार नाहीत. दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्यावर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज