मॉरीसचा बॉडीगार्ड म्हणतो, मला फसवलंय; अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी!
Abhishek Ghosalkar Murder Case राजकीय वैमनस्यातून आणखी एक हत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू: ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)यांची दोन दिवसांपूर्वी मॉरीस नोरोन्हा या गुंडानं गोळ्या घालून हत्या केली. या हत्येनंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police)या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील मॉरीसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्राला (Amarendra Mishra)आज न्यायालयात हजर केले. त्याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मिश्राच्याच बंदुकीतून घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
Bhakshak: जस्मीत गौर बनून बॉलिवुडमधून सईने पुन्हा एकदा वेधलं लक्ष, पाहा फोटो
अमरेंद्र मिश्राची पोलीस कालपासून चौकशी करत आहेत. त्यात आज त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयातून बाहेर पडताना अमरेंद्र मिश्राने माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मिश्राला गाडीत बसवल्यानंतर त्याने ओरडून ‘मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ गलत हुआ है. मुझे फसाया गया है असं सांगितलं. त्यानंतर मिश्राला पोलिसांनी शांत बसवून गाडी हलवली.
Manoj Jarange : तुला अक्कल होती तर जेलमध्ये कशाला गेला…जरागेंनी भुजबळांना डिवचले
अमरेंद्र मिश्राच्या अशा प्रकारच्या विधानानंतर अभिषेक घोसाळकर मृत्यूप्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहावं लागणार आहे. मिश्राच्या अशा वक्तव्याचा नेमका काय अर्थ अशा पद्धतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस नोरोव्हा याने स्वतःलाही संपवलं. अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरीसचा असलेला वाद मिटवून त्याने ऑफिसला बोलावलं होतं.
यावेळी दोघांनी एकत्र येण्याचा संकल्पही केला. मिळून एकत्र लोकांची सेवा करण्याचंही ठरलं मात्र, बोलणं संपल्यानंतर मॉरिसने पाच राऊंड फायर करत घोसाळकर यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:लाही गोळ्या झाडून संपवलं. या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
फेसबुक लाईव्ह करत असतानाच घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या फायर करण्यात आल्या. त्यामुळे या गोळ्या नेमक्या मॉरीस यानेच झाडल्या का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.