राजकीय वैमनस्यातून आणखी एक हत्या; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू
Jalgaon News : राजकीय वैमनस्यातून गोळीबाराची आणखी एक घटना उजेडात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) चाळीसगावमधील भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथील अशोका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
दरम्यान, मुंबईतील दहिसर येथील गोळीबारात ठाकरे गटाचे माजी नगरेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना उजेडात आली आहे. याआधी उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनीही शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनांनी मोठी खळबळ उडाली.
मॉरिसच्या डोक्यात अभिषेक घोसाळकरांबद्दल राग; म्हणायचा, ‘मी त्याला संपविणारच’, मॉरिसच्या पत्नीचा जबाब
चाळीसगाव मधील स्टेशन रोड भागात मोरे वास्तव्याला होते. राजकारणाबद्दल बोलायचे झाल्यास अपक्ष आणि भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. यामध्ये काही हल्लेखोर तोंड झाकून येत असल्याचे दिसत होते. त्यांच्यावर गोळीबार का करण्यात आला याचे उत्तर अजून पोलिसांनाही सापडलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
7 फेब्रुवारी रोजी महेंद्र मोरे (Mahendra More) त्यांच्या कार्यालयात बसले होते त्यावेळी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात मोरे गंभीर जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात हा गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी अद्याप एकाही आरोपीली अटक करता आलेली नाही. गोळीबार करणारे आरोपी मोकाटच आहेत. राज्यात सातत्याने घडत असलेल्या या गोळीबाराच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी