Sanjay Raut : कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्यात

Sanjay Raut : कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्यात

Sanjay Raut On Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिवसेंदिवस भाजपसाठी डोकेदुखी वाढत आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट नाकारल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपला धक्का माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी दिला आहे.

भाजपने मंगळवारी (12 एप्रिल) कर्नाटक विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 189 उमेदवारांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या यादीत लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

लक्ष्मण सवदी यांनी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले आसता राऊत म्हणाले की, ‘कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्यात, फक्त लक्ष्मण सवदीच नाही तर असंख्य आमदार, असंख्य प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री, सर्वांनीच राजीनामे द्यायला सुरू वात केली आहे. मोदी, शाह भाजपच्या नेत्यांची जी काही भीती होती ती न राहता तोंडावर राजीनामे फेकू निघून गेले आहेत.’

Karnataka Elections : दोघा सख्ख्या भावांतच जुंपणार; एकाला भाजप तर दुसऱ्याला काँग्रेसचे तिकीट

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर आता नागपूरमध्ये सभा घेतली जाणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली असून उद्या रविवार, 16 एप्रिलला ही सभा होणार असून यासाठी आजच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नागपूरमध्या दाखल झाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube