बॅनरवर शाईफेक चुकीचीच, चौकशी झाली पाहिजे; सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात

बॅनरवर शाईफेक चुकीचीच, चौकशी झाली पाहिजे; सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात

Supriya Sule : बॅनरवर शाईफेक चुकीचीच, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात इसमांनी शाईफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे चुकीचंच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शाईफेक कोणी केली याची, चौकशी झाली पाहिजे. कुणाचाही बॅनर असो, शाईफेक करणं चुकीचंच असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता बारामती लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत येत आहे. सुप्रिया सुळे याचं मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीवरुन लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यास नणंद आणि भावजयांमध्येच लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

…तर बारामतीकरच चोप देतील :
कोणीही नालायकपणा करु नका, शाईफेकीची जी घटना आहे ती अत्यंत तापदायक आणि निंदादायक घटना
लोकशाहीत कोणालाही आपले बॅनर लावण्याचे अधिकार आहेत. नालायकाने तसं काही केलं असेल तर त्याचा धिक्कार निषेध आहे. नालायकांनो एखाद्या स्त्रीच्या बॅनरवर शाई फेकण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही यांना बारामतीकरच चोप देतील, असा इशाराच अमोल मिटकरींनी दिला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलच तापू लागलं आहे. अशातच बारामतीत एक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेकण्याची घटना घडल्याचं समोर आलं आहे. काऱ्हाटी गावच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असा मजकूराचे बॅनर लावण्यात आले होते. या फलकावर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube