अदृश्य शक्तींनी शरद पवारांकडून पक्ष हिसकावला; सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका
Suprisya Sule : अदृश्य शक्तींनी शरद पवार यांच्याकडून पक्ष हिसकावला असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचा यावर निवडणूक आयोगाकडून निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलं आहे.
Fighter Movie: दीपिका अन् हृतिक वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे अदृश्य शक्तीला यश आहे, आश्चर्यकारक निर्णय नाही. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे देशाच्या इतिसाहास पहिल्यांदा घडलं आहे. हे मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष आहे, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष तोही मराठी आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात अदृश्य शक्ती जे निर्णय घेते त्याचं हे आणखी एक उदाहरण. आमदारांच्या संख्येवरुन पक्ष ठरत नाही संघटना ठरवते संघटना पवारांसोबत असून आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं आहे.
तसेच हा माझा राजकीय विषय आहे, वैयक्तिक नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे. अदृश्य शक्तींनी शरद पवारांकडून पक्ष हिसकावला आहे. शरद पवार पुन्हा एकदा पक्ष उभा करतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, आम्ही न्याय मागणार आहोत. निवडणूक आयोगाने उद्या तीन नावे आणि तीन चिन्हे मागितली आहे, आम्ही कोणती चिन्हे नावे देणार हे उद्या समजणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.