Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती

Loksabha Election 2024 : बॉक्सर विजेंद्रचा काँग्रेसला अलविदा; ‘पंजा’ सोडून भाजपचं कमळ घेतलं हाती

Boxer Vijender Singh Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. इंडिया आघाडी (India Alliance)आणि एनडीची (NDA)सरळसरळ लढत होणार आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक अर्थानं एनडीए आणि इंडिया आघाडीसाठी महत्वाची समजली जात आहे. त्यातच दोन्ही आघाड्यांकडून आपापले उमेदवार जाहीर केले जात आहेत. काही नाराज असलेले उमेदवार इकडून तिकडं उड्या मारताना देखील दिसत आहेत. त्यातच आता कॉंग्रेसला (Congress)एक धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बॉक्सर विजेंद्र सिंहने दिल्ली भाजपचे मुख्यालय गाठून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विजेंद्रचा भाजप प्रवेश हा कॉंग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

विजेंद्रने 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला पहिल्याच निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हापासून तो कॉंग्रेस पक्षाशी जोडलेला होता. त्यानंतर मात्र डिसेंबर 2023 मध्ये ते राजकारणातून निवृत्त घेणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती.

त्यानंतर नुकतीच विजेंद्र सिंहने X वर पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, जनतेची इच्छा असेल त्या ठिकाणी जायला मी तयार आहे. विजेंद्र सिंगने 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव मथुरेतील उमेदारीसाठी चर्चेत होतं. या मतदारसंघातून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत. बॉक्सर विजेंद्र सिंह हा जाट समुदायाचं प्रतिनिधित्व करतो. हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या जागांवर विजेंद्र सिंहचा मोठा राजकीय प्रभाव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज