Congress पक्षाला निधीची चणचण? रॅलीतील प्रत्येक खुर्चीला लावले क्युआर कोड

Congress पक्षाला निधीची चणचण? रॅलीतील प्रत्येक खुर्चीला लावले क्युआर कोड

Congress : काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. याच काँग्रेसचा आज 28 डिसेंबर रोजी 139 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून ‘है तयार हम’ ही महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यान एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया ठरली 2023 साठी गेम-चेंजिंग OTT अभिनेत्री

या महारॅलीच्या मैदानावर ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर काँग्रेस पक्षाला तुम्ही निधी द्या असं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे. यासाठी मैदानावरील प्रत्येक खुर्चीच्या पाठीमागे क्यूआर कोड लावण्यात आलाय. www.donet.inc.in या काँग्रेस पक्षाच्या वेबसाईटवर हे डोनेशन पाठवण्यासाठी या पोस्टर्समधून आवाहन करण्यात आले आहे.

“आधी पार्थला तर निवडून आणा” : थेट आव्हान देत विकास लवांडेंनी ठेवलं अजितदादांच्या दुखऱ्या नसेवर बोट

त्यामुळे हे स्पष्ट दिसत आहे की, काँग्रेस केवळ भाषण करून किंवा कार्यक्रम आयोजित करून लोकसभा निवडणुकीची तयारी करत नाही. तर ते लोकसभेच्या निवडणुकीसाठी निधीदेखील गोळा करायला सज्ज झाले आहेत. कारण या महारॅलीमध्ये असंख्य लोक येणार आहेत. जे या डोनेशनच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाशी जोडले जाणार आहेत. तसेच हे येणारे लोक काँग्रेस पक्षाला किती प्रमाणात निधी देणार? हे आगामी काळातच समोर येईल. पण काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकांसाठी चांगलाच तयारीला लागलाय हे दिसून येते.

8 Doan 75: “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच!

त्याचबरोबर अशी देखील चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे की, काँग्रेस (Congress) हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. या पक्षाची केंद्रात, अनेक राज्यात अनेक वर्ष सत्ता राहिली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून या पक्षाची राजकीयदृष्ट्या पिछेहाट झाली आहे. त्याचबरोबर आता या पक्षाला निधीची चणचण भासू लागली आहे. पक्षाला निधी मिळविण्यासाठी डोनेट फॉर देश हे कॅम्पेन काँग्रेसने सुरू केले आहे.

काँग्रेसची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे कॅम्पेन सुरू केले असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेसला कॉर्पोरेट क्षेत्राकडून पक्ष निधी मिळत नसल्याने ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. राजकीय पक्षांकडून येत असलेल्या पक्ष निधीचा विचार केल्यास सत्ताधारी भाजपकडे (Bjp) सध्या सर्वाधिक पैसा आहे. तर काँग्रेसना मिळणाऱ्या निधीत घट झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज