8 Doan 75: “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच!

8 Doan 75: “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच!

8 Doan 75 Teaser Launch: नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (8 Doan 75 Movie) या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. (8 Doan 75 Marathi Movie) ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! (Social Media) हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. शर्वाणी – सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे – विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही जास्त पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या मराठी चित्रपटाने केली आहे.

Year Ender 2023: सीमा देव ते रविंद्र बेर्डे; ‘या’ मराठी कलाकारांनी घेतला 2023 मध्ये जगाचा निरोप

८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर बेतला आहे. एन्जॉय एन्जॉय हे गाणं आयुष्य साजरं करण्याचा संदेश देते. गणेश निगडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला सुहित अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केेलं आहे. तर आदर्श शिंदे आणि सुहित अभ्यंकर यांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणारं हे गाणं आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं स्वागत करताना एन्जॉय एन्जॉय तर व्हायलाच हवं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube