BJP Candidates List : भाजपकडून आठवी यादी जाहीर, अभिनेता सनी देओलचं तिकीट कापलं

BJP Candidates List : भाजपकडून आठवी यादी जाहीर, अभिनेता सनी देओलचं तिकीट कापलं

BJP Candidates List : देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच (Lok Sabha elections 2024) बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सर्वच पक्षांकडून आता आपापले उमेदवारी जाहीर केले जात आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचे (Sunny Deol) तिकीट रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या जागी दिनेश सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे.

Government Schemes : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

भाजपने तीन राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी ही यादी यादी जाहीर केली असून त्यात ११ उमेदवारांची नावे आहेत. ओडीसातील तीन, पश्चिम बंगालमध्ये दोन आणि पंजाबमध्ये सहा जागांवर उमेदवार दिले आहेत. भाजपने जाहीर केलेल्या आठव्या यादत दिनेश सिंह ‘बब्बू’ यांना पंजाबमधील गुरुदासपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय अमृतसरमधून तरनजीत सिंग संधू, जालंधरमधून सुशील कुमार रिंकू आणि लुधियानामधून रवनीत सिंग बिट्टू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिंदे, भाजपची ‘राष्ट्रवादी’कडून निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार; कारणे तरी काय ? 

त्याचवेळी पक्षाने प्रनीत कौर यांना पटियाला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत.

भाजपने फरीदकोटमधून हंस राज हंस यांना उमेदवारी दिली आहे. हंस राज हंस सध्या उत्तर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. भाजपने लुधियानामधून रवनीत सिंह बिट्टू आणि जालंधरमधून सुशील कुमार रिंकू यांना तिकिटे दिले.

यासोबच भाजपने ओडिसातील तीन जागांसाठी आपल उमदेवार जाहीर केले आहेत. यामध्ये जाजपूरमधून रवींद्र नारायण बेहरा यांनी उमेदवारी दिली आहे. तर कंधमालमधून सुकांत कुमार पाणिग्रही आणि कटकमधून भर्त्रीहरी महताब यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज