शिंदे, भाजपची ‘राष्ट्रवादी’कडून निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार; कारणे तरी काय ?

  • Written By: Published:
शिंदे, भाजपची ‘राष्ट्रवादी’कडून निवडणूक आयोगाकडे गंभीर तक्रार; कारणे तरी काय ?

Sharad Pawar group complaint Election Commission of India: राज्यातील लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीसाठी महायुती व महाआघाडीकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. अनेक ठिकाणी तुल्यबळ लढती होत असल्याने राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. त्यात स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर होत आहे. या स्टार प्रचारकांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar Party) पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना व भाजपला (BJP) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. स्टार प्रचारकांची यादी जाहीर करताना त्यांच्याकडे असलेले सार्वजनिक पदे वापरण्यात आली आहे. तसेच एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे स्टार प्रचारकांचे नावे जाहीर केली आहेत. यातून आचारसंहितेचा भंग होत असल्याची गंभीर तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Loksabha Election 2024 : बारामतीचा उमेदवार जाहीर का होत नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह केंद्रातील मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तिघे व इतर मंत्र्यांचा समावेश आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार आहे. ही नावे जाहीर करताना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमाचे उल्लंघन होत आहे. नावांसमोर सार्वजनिक पदेही देण्यात आलेले आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सार्वजनिक पदे आहेत. या पदांसह नावे जाहीर केली आहे.

तुम्हाला निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा; मनोज जरांगेंची लोकसभा निवडणुकीतून माघार

यातून लोकप्रतिनिधी कायद्यानुसार व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. केंद्र, राज्यातील सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक पदांचा वापर करण्यास निवडणूक काळात प्रतिबंधित आहे. त्यामुळे ही निवडणूक मुक्त आमि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी या पक्षांवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीच राष्ट्रवादी काँग्रेसची आहे.

तक्रारीत काय म्हटलंय ?

राष्ट्रवादीने काँग्रेसने शनिवारी ही तक्रार केली आहे. वकिलांमार्फतही तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे. भाजपने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचेही आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पक्ष हा स्वतःच्या पक्षाचा सदस्य असलेल्या व्यक्तींना स्टार प्रचारक म्हणून जाहीर करून शकतात. इतर दुसऱ्या पक्षांतील नेत्यांची नावे आपल्या पक्षात स्टार प्रचारक म्हणून जाहीर करू शकत नाही. हे कायद्याने उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज