“मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार”; भाजप प्रवेशाच्या चर्चांना नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

“मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार”; भाजप प्रवेशाच्या चर्चांना नाथाभाऊंचा फुलस्टॉप!

Eknath Khadse : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) पक्ष सोडल्यानंतर लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. या राजकारणातच पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा ऐकू येत होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राजकारणातून गायब झाले होते. नेहमीप्रमाणे आक्रमक पद्धतीने पक्षाची बाजू मांडतानाही दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले होते. आता मात्र स्वतः खडसे यांनीच सोशल मीडियावर भूमिका मांडत या चर्चांना पूर्णविराम दिला.

एकनाथ खडसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाइउंटवर पोस्ट शेअर केली आहे. गेले काही दिवस मी भाजपामध्ये प्रवेश करणा अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा या हेतूने पसरवल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे असे खडसे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतण्याची तयारी करत आहेत. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी अजून ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यामुळे खडसेंचा पक्षप्रवेश रखडल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मागील काही दिवसांपासून खडसे राज्याच्या राजकारणातून गायब झाले आहेत. आधीप्रमाणे पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडतानाही ते दिसत नाहीत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने दिल्यापासून खडसे राजकारणातून गायब झाल्याचे दिसत आहे. या घडामोडींमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले होते.

आता मात्र या चर्चा खऱ्या नसल्याचे एकनाथ खडसे यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आता टळल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

संकटमोचक गिरीश महाजन अंतरवलीमध्ये दाखल, मागण्या मान्य करण्यासाठी मागितला एका महिन्याचा वेळ

काय म्हणाले गिरीश महाजन ? 

एकनाथ खडसे भाजपात परतण्यासाठी फार जोर लावत आहेत अशी माहिती मला कळाली आहे. पण पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत अजून तरी विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजून तरी एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात घ्यायचे की नाही याबाबत कुणीही विचारलेले नाही. मी एक लहान कार्यकर्ता आहे. एकनाथ खडसे यांची कदाचित थेट वरून हॉटलाइन असेल तर त्यांनी लावावी, असे महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज