Government Schemes : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

Government Schemes : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत (Pradhan Mantri Vishwakarma Skill Scheme)पारंपारिक कारागीर (Traditional craftsman)आणि शिल्पकारांना आर्थिक मदत दिली जाते. प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत, लाभार्थींनाना विनातारण कर्ज, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास मदत दिली जाते. नोंदणीकृत पात्र कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट प्रोत्साहन अनुदान म्हणून 15 हजार रुपये आणि दोन लाख रुपयांपर्यंत सवलतीच्या व्याजदराचे कर्ज दिले जाणार आहे.

नवनीत राणांचं टेन्शन वाढलं! अमरावतीतून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रं
– आधार कार्ड
– मतदार ओळखपत्र
– व्यवसायाचा पुरावा
– मोबाईल नंबर
– बँक पासबुक झेरॉक्स
– उत्पन्नाचा दाखला
– जात प्रमाणपत्र

…तर राहुल गांधींसाठी संपूर्ण थिएटर बुक करेल; स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिल्यावर फडणवीसांचा टोमणा

योजनेचा लाभ कसा मिळतो?
योजनेसाठी पात्र कारागीरांना पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते. त्यांना पाच ते सात दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि दररोज 500 रुपये स्टायपेंडसह 15 दिवस प्रगत प्रशिक्षण दिले जाते.
मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला पात्र लाभार्थींना ई-व्हाउचरच्या स्वरुपात 15 हजार रुपयांपर्यंतचे टूलकिट प्रोत्साहन दिले जाते.
या योजनेंतर्गत 5 टक्के व्याजाच्या सवलतीच्या दराने 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 1 लाख आणि 2 लाख रुपयांच्या दोन टप्प्यांत 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन देखील मिळते.

कोण घेऊ शकतो लाभ?
सोनार, कुंभार, मोची, गवंडी, मॅट व झाडू निर्माता, बाहुली व खेळणी निर्माता, न्हावी, माला निर्माता, परीट, शिंपी, मासेमारी जाळी बनविणारे कारागीर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासासाठी आवश्यक पात्रता
– अर्जदार भारतीय नागरिक असावा.
– अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
– अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
– मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
– योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थ्याला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट : pmvishwakarma.gov.in वर जा.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज