Pune Loksabha : पुण्यात वंचितला मोठे मोहरे भेटले; वसंत मोरे, मंगलदास बांदल यांना उमेदवारी

Pune Loksabha : पुण्यात वंचितला मोठे मोहरे भेटले; वसंत मोरे, मंगलदास बांदल यांना उमेदवारी

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलीयं. त्यामुळे आता पुणे लोकसभेत आता तिरंगी लढत होणार असल्याचं दिसून येत आहे. तर बारामती मतदारसंघात वंचितने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनूसार नांदेडमध्ये अविनाश बोसिकर तर परभणीतून बाबासाहेब उगले, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, शिरुरमधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी आता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनीही उमेदवारी यादी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी आठ जागांवर उमेदवार दिले होते.

ठाकरेंचा एका दगडात दोन ‘पक्षांवर’ निशाणा; उन्मेष पाटील अन् करण पवारांचा भाजपला ‘राम-राम’

आता तिसऱ्या यादीतही पाच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत वंचितने 24 जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, सातारा या महत्त्वाच्या जागांवर वंचितने उमेदवार दिले आहेत. तर तिसऱ्या यादीत नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, शिरुर मतदारसंघात उमेदवारी दिले आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी येईल, असे चित्र काही दिवसांपूर्वी होते. परंतु महाविकास आघाडीतील नेते व प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकमत झाले नाही.

विक्रम काळे, बसवराज पाटील अन् परदेशी नक्कीच नाहीत… घरातूनच मिळणार निंबाळकरांना टफ फाईट

वंचितकडून पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर आता चांगलाच ट्विस्ट येणार आहे. पुणे लोकसभेसाठी अनेकांची उमेदवारीसाठी ताकद लावली होती. यामध्ये काँग्रेसचे नेतेमंडळी, तसेच महायुतीकडूनही अनेक नेत्यांनी जोर लावला होता. अखेर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत अपक्षचा नारा देऊन निवडणुकीसाठी दंड थोपटलेल्या वसंत मोरे यांना वंचितकडून संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित फॅक्टरमुळे अनेक उमेदवारांना घरीच बसण्याची वेळ आली होती. वंचित फॅक्टरचा महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनाही फटका बसला होता. त्यामुळे आता पुण्यात नेमका कोणाला फटका बसणार? वसंत मोरेंची उमेदवारी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना जड जाणार का? हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज