Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द

Nilesh Lanke : … तर संसदच बंद पाडतो, शरद पवारांसमोर निलेश लंकेंचा शब्द

Nilesh Lanke : मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील 12 च्या 12 जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके (Nilesh Lanke) जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी कसला पहिलवान आहे. संसदेत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर संसद बंद पाडेल अशा शब्दात अहमदनगरचे खासदार निलेश लंके शरद पवारांसमोर (Sharad Pawar) गरजले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी शरद पवारांना मोठा शब्द देत आगामी विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागांवर आमचा विजय होणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी निलेश लंके म्हणाले, निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी कसला पहिलवान आहे. जर सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाहीतर संसदच बंद पाडतो. मी फक्त शरद पवारांमुळेच खासदार झालो असं देखील निलेश लंके म्हणाले. तसेच आजपासूनच विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे. नगर जिल्ह्यातील बाराचे बारा आमदार शरद पवारांना जवळ नेणार मी जे बोलतो तेच करतो असं म्हणत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले आहे.

तर विरोधकांवर टीका करत खासदार निलेश लंके म्हणाले, सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा पवार इस द पावर. नाद करा मात्र शरद पवारांचा नाही कारण पवारांचा नाद केला की थेट घरीच नेऊन बसवलं जातं असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले, लवकरच NDA चा आकडा 284 वरुन…

आज अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी पक्ष प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह मोठ्या संख्यने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनुभाऊ काय बोलून गेले; माझ्या एका डोळ्यातील आश्रू पंकजांसाठी नव्हे तर…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज