पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले, लवकरच NDA चा आकडा 284 वरुन…
Ajit Pawar : नुकतंच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) एनडीएला (NDA) स्पष्ट बहुमत मिळाले असून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. तर आता पुन्हा एकदा देशात राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठा दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, येत्या काही दिवसात संसदेचा अधिवेश सुरु होणार असून या अधिवेशनात एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा दावा अजित पवार यांनी केला आहे तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही अजित पवार म्हणाले. यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार म्हणाले, देशात राजकीय स्थिती कायम बदलत राहते, या लोकसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज चुकले आहे, काय निकाल लागेल हे ब्रह्मदेवालाच माहिती असं मी म्हणालो होतो. यामुळे पुन्हा एकदा आपल्या नव्या उमेदीने काम करायचं आहे असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्याच बैठकीत मी सर्व घटक पक्षांना वेळ देऊ शकत नाही असं सांगतिले होते त्यांनी स्वतंत्र कराभार आणि राज्यमंत्रीपद देण्याबाबत सांगितलं होतं.
यामुळे आपण प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलं होतं मात्र यापूर्वी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद हाताळलं असल्याने स्वतंत्र कारभार पाहणं आम्हाला पटत नसल्याचं आम्ही सांगितलं. त्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र कारभार दिल्याचं म्हणाले मात्र तुम्हाला जमत नसेल तर पद स्विकारणार नाही आम्ही सांगितलं. आम्ही एनडीएच्या पाठीशीच राहू. पण त्याचा विपर्यास करत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या .
1 जुलै किंवा 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळतील असा दावा देखील त्यांनी वेळी केला. तसेच आपण महायुतीला आलो मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आम्ही सोडणार नाही हे मी मित्रपक्षांनाही स्पष्ट सांगितलं आहे मात्र तरीही देखील विरोधक चुकीच्या पद्दतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनुभाऊ काय बोलून गेले; माझ्या एका डोळ्यातील आश्रू पंकजांसाठी नव्हे तर…
एनडीए सरकार 5 वर्षं टिकणार आहे आणि अधिवेशनानंतर 284 चा आकडा 300 च्या पुढे जाईल हे तुम्ही पाहा असा दावा देखील त्यांनी यावेळी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.