तिसरा विजय; पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन

तिसरा विजय; पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलं नरेंद्र मोदींचं अभिनंदन

Pakistan PM Shehbaz Sharif Congratulates PM Modi  : नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आजा अनेक देशातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Pakistan PM) आज पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ; नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. दुसरीकडे, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह भारताचे शेजारी देश आणि हिंदी महासागर क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित होत्या.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत, काही घटना वगळता दोन्ही देशांचे नेते संघर्ष कमी करण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. दरम्यान, शेहबाज शरीफ यांना निमंत्रण न देण हा एक याच तणावाचा भाग मानला जातो. दोन्ही देशांमधील सध्या सुरू असलेल्या राजनैतिक संघर्ष यामधून दिसून येतो.

रेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या एकूण 71 खासदारांनी पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य खासदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी सत्ताधारी एनडीएच्या खासदारांसह विरोधी पक्षांतील खासदार उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज