NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

NDA Cabinet : राजनाथ सिंह, अमित शाहांनतर ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

NDA Cabinet 3.0 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी पार पडला. यावेळी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी राजनाथ सिंह Rajnath Singh) आणि अमित शाह यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

जेपी नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश, कॅनिबेट मंत्रिपदाची घेतली शपथ 

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडला.  नरेंद्र मोदींसह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याआधी अमित शाह हे गृहमंत्री राहिलेले आहेत. शाह यांच्यानंतर भाजप नेते नितीन गडकरी यांनीही केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

PM Modi : “मैं नरेंद्र दामोदरदास मोदी..” तिसऱ्यांदा शपथ घेत मोदी पंतप्रधानपदी विराजमान 

त्यानंतर भाजप अध्यक्ष यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमन, डॉ. सुब्रम्हण्यम जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एच डी. कुमारस्वाम, पियुष गोयल, धर्मेद्र प्रधान, जीतनराम मांझी, जेडीयू नेते राजीव रंजन सिंह, सदानंद सोनवाल, डॉ. विरेंद्र कुमार यांनीही यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

प्रज्वल रेवण्णाच्या काकांनीही घेतली शपथ
केवळ दोन खासदार असलेले जेडीएसचे एचडी कुमारस्वामी यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. कुमारस्वामी हे सेक्स टेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रज्वल रेवण्णाचे काका आहेत.

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला भारताच्या अनेक शेजारी देशांचे प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी 7000 लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यासोबतच कला, क्रीडा, उद्योग आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांशी निगडित देशभरातील दिग्गज उपस्थित होते. मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि अभिनेता शाहरुख खान यांनीही हजेरी लावली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज