Pakistan PM: अन्वर उल हक कक्कर पाकिस्तानचे 8 वे काळजीवाहू पंतप्रधान

Pakistan PM: अन्वर उल हक कक्कर पाकिस्तानचे 8 वे काळजीवाहू पंतप्रधान

Pakistan PM: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अन्वर उल हक कक्कर यांची पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.

पीएमओच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पीएम शहबाज आणि नॅशनल असेंब्लीमधील विरोधी पक्षनेते (एनए) राजा रियाझ यांनी अन्वर उल हक कक्कर यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची शिफारस राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे केली आहे. कक्कर आज (शनिवारी) शपथ घेण्याची शक्यता आहे.

Payal Waje: शिवली परबचं नवीन रोमँटिक गाणं ‘पायल वाजे…’ आलंय प्रेक्षकांच्या भेटीला!

9 ऑगस्ट रोजी संसद विसर्जित होण्यासोबत पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा कार्यकाळही संपुष्टात आला होता. अशा परिस्थितीत आज काळजीवाहू पंतप्रधान निवडीची शेवटची तारीख होती.

तत्पूर्वी, पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी शहबाज शरीफ यांना पत्र लिहून लवकरात लवकर नवीन काळजीवाहू पंतप्रधान नियुक्त करण्याची विनंती केली होती. कलम-224A अंतर्गत नॅशनल असेंब्लीचे विसर्जन झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत शरीफ आणि रियाझ हे मिळून काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी नेत्याचे नाव ठरवतील, असे त्यांनी म्हटले होते.

‘NDA’त असंतोषाची ठिणगी! मणिपूरवर बोलू दिलं नाही; मित्रपक्षाचा खासदार भडकला

कोण आहे अन्वर उल हक कक्कर
अन्वर उल हक कक्कर हे बलुचिस्तानचे खासदार आहेत. ते बलुचिस्तानमधील अवामी पक्षाचे (बीएपी) प्रतिनिधित्व करतात. 2018 मध्ये बलुचिस्तानमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ मार्च 2024 मध्ये संपणार आहे.

त्यांनी परदेशी पाकिस्तानी आणि मानव संसाधन विकासावरील सिनेट स्थायी समितीचे अध्यक्ष आणि व्यापार, वित्त आणि महसूल, परराष्ट्र व्यवहार आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. कक्कर यांनी 2018 मध्ये स्थापन झालेल्या बलुचिस्तान अवामी पक्षाच्या संसदीय नेत्याची भूमिकाही सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube