मोदींच्या मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू, काय म्हणाले प्रफुल पटेल?

मोदींच्या मंत्रिमंडळातून अजित पवार गटाला डच्चू, काय म्हणाले प्रफुल पटेल?

Praful Patel : नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक खासदार शपथ घेणार आहेत. त्यात भाजपचे 5 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक असे 6 खासदार शपथ घेणार आहेत. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झालं. यासंदर्भात आता ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या प्रफुल पटेल (Praful Patel)  यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्हाला काही काळ धीर धरण्यास सांगितले आहे, असं पटेल म्हणाले.

राज्यमंत्रिपद अमान्य, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदंच पाहिजे; अजितदादांनी ठरलेलंच सांगितलं 

प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की,
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्याच्यात भाजपच्या काही श्रेष्ठींची चकू आहे किंवा नाही, असं नाही. महाराष्ट्रातून शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले आहेत. त्या पध्तीने त्यांना ज्या सूचना मिळाल्या, त्याच पद्धतीने आम्हालाही सूचना मिळाल्या आहेत. तुम्ही थोडे दिवस धीर ठेवा, हेही आम्हाला सांगण्यात आलं. मी एवढेच म्हणेन की, त्यांनी महाराष्ट्रात जो काही निर्णय घेतला असेल, तो शिवसेनेशी तुल्यबळ समजूनच आमच्याबाबत निर्णय घेतला असावा, असं पटेल म्हणाले.

स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू 

पुढं बोलतांना पटेल म्हणाले, आमच्यात काही मतभेद आहेत, तटकरे विरुद्ध प्रफुल्ल पटेल असे काही नाही. आम्ही सगळे एकत्रच होतो, माझ्या नावाचा निर्णय आमच्या पक्षाने एकमताने बसूनच ठरवला होाता. तत्यामुळे हा वादाचा विषय नाही, असंही पटेल म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश होणार आहे. भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना मंत्री करण्यात येणार आहे. तर रामदास आठवले यांना पुन्हा एकदा केंद्रात मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांनाही पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन आला. प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube