राज्यमंत्रिपद अमान्य, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदंच पाहिजे; अजितदादांनी ठरलेलंच सांगितलं

राज्यमंत्रिपद अमान्य, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदंच पाहिजे; अजितदादांनी ठरलेलंच सांगितलं

Ajit Pawar : भाजप नेते तथा एनडीएचे गटनेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक खासदार शपथ घेणार आहेत. त्यात भाजपचे 5 आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक असे 6 खासदार शपथ घेणार आहेत मात्र, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झालं. त्यावर आता खुद्द अजित पवारांनी भाष्य केलं.

स्मृती इराणी, मीनाक्षी लेखी, कराड अन् राणे.. जुन्या कॅबिनेटमधील 20 दिग्गजांना डच्चू 

अजित पवार हे आज दिल्लीत मोदींच्या शपथविधीला गेले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत राजनाथ सिंह, जेपी नड्डा, अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील पराभव संदर्भात चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना विनंती केली, आमचा सध्या राज्यसभेत एक खासदार आहे, आणि लोकसभेत एक खासदार निवडून आला आहे. राज्यसभेत आणखी आमचे दोन खासदार जातील. त्यामुळं आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावं. त्यानंतर त्यांचा फोन आला. त्यांनी राज्यमंत्री पद देऊ केलं होतं. मात्र, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रीपद आम्ही स्वीकारलं नाही. कारण, प्रफुल्ल पटेल यांनी अनेक वर्ष केंद्रात काम केलं. ते कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. युपीए सरकारमध्ये पटेल मंत्री होते, असं अजित पवार म्हणाले.

पुण्यात भाजपची ताकद वाढली! मोहोळांना मंत्रिपद मिळणं अजितदादांसाठी धोक्याची घंटा! 

ते म्हणाले, पटेलांनी अनेक वर्ष केंद्रात काम केलं. त्यामुळं आम्हाला कॅबिनेट मंत्रीपदंच हवं. हवं तर आम्ही मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत थांबायला तयार आहोत असं आम्ही भाजपला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.

राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपदाची संधी
नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश होणार आहे. भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांना मंत्री करण्यात येणार आहे. तर रामदास आठवले यांना पुन्हा एकदा केंद्रात मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांनाही पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन आला. प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube