पुण्यात भाजपची ताकद वाढली! मोहोळांना मंत्रिपद मिळणं अजितदादांसाठी धोक्याची घंटा!

पुण्यात भाजपची ताकद वाढली! मोहोळांना मंत्रिपद मिळणं अजितदादांसाठी धोक्याची घंटा!

Muralidhar Mohol : भाजप नेते तथा एनडीएचे गटनेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अनेक खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हेही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी (Ajit Pawar) धोक्याची घंटा समजली जात आहे.

मुरलीधर मोहोळ कलमाडी, धारिया यांच्या रांगेत ! तब्बल 28 वर्षानंतर जनतेतून निवडून आलेल्या खासदार मंत्री 

अजितदादा गटाला मंत्रिपद नाही
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झालं. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे.

मोहोळांना मंत्रिपद अजितदादांसाठी धोक्याची घंटा
गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा, विशेषतः अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पुण्यावर अजित पवारांनी कायम वर्चस्व ठेवलं. सत्तेत असताना पुण्याचं पालकमंत्रीपद स्वत: अजित पवारांकडे असायच. सध्याही पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहेच. दरम्यान, राष्ट्रवादीत बंडाळी केल्यांतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी बारामती आणि शिरूर लोकसभा लढवली. या दोन्ही मतदारसंघात त्यांच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव ुझाला. बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंनी अजित पवार गटाच्या उमेदवारांना शह दिला. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला

त्यानंतर आता पुण्यातील अजितदादांच्या वर्चस्वाला आणखी धक्का देण्याची तयारी भाजपने तयारी सुरू केली. मोहोळ यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात येतं. त्या माध्यमातून त्यांचे मागे भाजप ताकद उभी करत असल्यचाची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत दादांना बसलेल्या धक्क्यांमुळे पुण्याचे राजकीय गणितं बदलली. मोहोळांना मंत्रिपद मिळाल्याने पुण्यात भाजपची ताकद वाढली. भाजपची वाढती ताकद आणि मोहोळांना मंत्रिपद मिळणं ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे.

कारण, पुण्यात सध्या भाजपचे आठ आमदार आहेत. आता भाजपने मोहोळ यांच्या मागे केंद्रीय मंत्रिपदाची ताकद उभी करून त्यांना बळ दिलं. याचा वापर करून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. यात मोहोळांना यश आल्यास त्याचा भाजपला विधानसभेत फायदा होईल. भाजपचे अधिक आमदार निवडून आल्यास अजित पवारांचे पालकमंत्रीपद धोक्यात येईल आणि अजितदादांचे पुण्यातील वर्चस्व संपेल.

कोण आहेत महापौर?
मुरलीधर मोहोळ हे संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी भाजपमध्ये बूथ प्रमुख म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व सचिव म्हणूनही काम पाहिले. मोहोळ हे 2002, 2007, 2017 मध्ये कोथरूडचे नागसेवक झाले. 2019 मध्ये महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. यानंतर आता पहिल्याच प्रयत्नात ते खासदार झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज