मुरलीधर मोहोळ कलमाडी, धारिया यांच्या रांगेत ! तब्बल 28 वर्षानंतर जनतेतून निवडून आलेला खासदार मंत्री

  • Written By: Published:
मुरलीधर मोहोळ कलमाडी, धारिया यांच्या रांगेत ! तब्बल 28 वर्षानंतर जनतेतून निवडून आलेला खासदार मंत्री

Murlidhar Mohol to take oath as minister in Modi 3.0: देशात तिसऱ्यांदा एनडीए/strong> (NDA) सरकारची स्थापना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पतंप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे मंत्रिमंडळ निश्चित झाले असून, आज संध्याकाळी 52 ते 55 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यातील महाराष्ट्राचे नावे निश्चित झाले आहेत. पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ (Murildhar Mohol) यांची मंत्रिपदी वर्णी लागत आहे. पहिल्याच टर्मला खासदार होत मंत्रिपद मिळविणारे मोहोळ हे पुण्यातील काही दिग्गज नेत्यांच्या रांगेत येऊन बसले आहेत.

प्रतापराव विठ्ठलाच्या कृपेने मंत्री, आम्ही मोदींचे कृतज्ञ…; कुटुंबाने मानले मोदींचे आभार

मागील दहा वर्षांत केंद्रात भाजपची सत्ता होती. 2014 मध्ये पुणे शहरातून अनिल शिरोळे, 2019 ला गिरीश बापट हे दोघे भाजपचे खासदार होऊन गेले. परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. स्वर्गीय गिरीश बापट हे राज्यात कॅबिनेटमंत्री होते. परंतु लोकसभेत गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. या काळात पुण्यातील प्रकाश जावडेकर हे राज्यसभेवर होते. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये 26 मे 2014 ते 5 जुलै 2016 या दोन वर्षांच्या कालावधीत ते हे पर्यावरण आणि हवामान विभागाचे राज्य मंत्री होते. काही काळ ते माहिती व तंत्रज्ञान मंत्री होते. त्यानंतर त्यानंतर तीन वर्ष केंद्रीय मनुष्यबळ मंत्री होते. 2021 पर्यंत ते केंद्रात मंत्री होते. म्हणजेच वेगवेगळ्या खात्यामध्ये ते सात वर्ष मंत्री होते. पण ते लोकातून निवडून आलेले नव्हते.

खासदार म्हणून शपथविधीला आलो पण… मंत्रिपद मिळाल्याने मोहळांना अश्रू अनावर


सुरेश कलमाडी, धारिया यांच्या रांगेत

दोन टर्म राज्यसभेचे सदस्य राहिलेले आणि त्यानंतर पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले सुरेश कलमाडी हेही केंद्रात मंत्री राहिले आहेत. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात सुरेश कलमाडी हे पुण्यातून खासदार होते. त्या काळात 1995 ला ते रेल्वे राज्यमंत्री होते.
मोहन धारिया काँग्रेस हे पुणे लोकसभा मतदारसंघातून 1971 मध्ये पहिल्यांदा निवडून आले होते. दोन वेळा ते पुण्याचे खासदार राहिले आहे. त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषविले आहे. 1977 मध्ये ते भारतीय लोकदलाचे सदस्य झाले. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात ते वाणिज्यमंत्री होते.


काकासाहेब गाडगीळ पहिल्याच मंत्रिमंडळात मंत्री

स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी काकासाहेब गाडगीळ हे पुण्यातील पहिले खासदार होते. पहिल्याच टर्मला (1947-1952) ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, खाण आणि ऊर्जा ही खाते होती.


विठ्ठलराव गाडगीळ ही मंत्री

काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ यांचाही पुण्यातील राजकारण दबदबा होता. ते राज्यसभा सदस्य होते. तसेत सलग तीन वेळा पुण्यातून लोकसभेवर गेले. ते इंदिरा गांधी यांच्या काळात संरक्षण उत्पादन मंत्री, माहिती व प्रसार मंत्री होते. ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज