खासदार म्हणून शपथविधीला आलो पण… मंत्रिपद मिळाल्याने मोहळांना अश्रू अनावर

खासदार म्हणून शपथविधीला आलो पण… मंत्रिपद मिळाल्याने मोहळांना अश्रू अनावर

Modi Cabinet Minister Muralidhar Mohol after Meeting : देशात एनडीएचे सरकार (NDA Govt) स्थापन होत असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज ( 9 जून ) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ ( Oath Ceremony ) घेणार आहेत. त्यामध्ये मंत्रिपद मिळालेल्या खासदारांमध्ये राज्यातील पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांचा ( Muralidhar Mohol ) समावेश आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने दिल्ली गाठली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या एनडीच्या नवनिर्वाचित आणि मंत्रिपदासाठी नाव निश्चित झालेल्या खासदारांच्या बैठकीत मुरलीधर मोहोळ सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचं दिसून आलं.

Nandita Patkar : नभ उतरु आलं! नंदिताचे ‘जैत रे जैत’ अंदाजातील फोटो

यावेळी बोलताना मोहोळ यांनी सांगितले की, मला मिळालेले मंत्रीपद हे पुणे शहराचा सन्मान आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी या सर्वांचे आभार मानतो. तसेच पंतप्रधान मोदी यांनी बैठकीमध्ये आपल्या पाठीवर थाप देत ‘कसे आहात पुणेकर’ असं आवर्जून विचारलं असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं.

संयुक्त राष्ट्राचं मोठं पाऊल; Israel-Hamas War मध्ये बालहक्कांचं उल्लंघन झाल्याचा रिपोर्ट

तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलो असलो तरी मला नऊ वाजेपर्यंत माहिती नव्हतं की, मला मंत्रिपद मिळेल मात्र मी महाराष्ट्र सदनमध्ये आराम करत असताना मला अचानक फोन आला. त्यामुळे आता मंत्री म्हणून जी काही जबाबदारी मिळेल ती पार पाडेल. असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या मंत्रिपदावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपातून राजकारणाला सुरुवात..

मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीवर नजर टाकल्यास त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली. याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होते. गणेशोत्सव मंडळातही कार्यकर्ता म्हणून त्यांची जबाबदारी असायचीच. खरं तर त्यांनी राजकारणात एक एक पायरी चढून आज मंत्रि‍पदापर्यंत मजल मारली आहे. भाजपात असताना मोहोळ यांनी अगदी बूथ प्रमुख म्हणून काम पाहिलं. यानंतर युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाची संधी त्यांना मिळाली. अशा पद्धतीने त्यांनी संघटनेत तब्बल 30 वर्षे योगदान दिलं.

मोहोळ यांनी भाजपमधून राजकारणात प्रवेश केला. पक्षात त्यांनी विविध पदं सांभाळली. मोहोळ पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच महापौर राहिले आहेत. मोहोळ यांचं कुटुंब कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी शिक्षणाबरोबरच कु्स्तीचेही धडे गिरवले. त्यांचे आजोबा, वडील, काका आणि मोठे बंधू पैलवान आहेत. पुण्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुस्तीची कला शिकण्यासाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोहोळ पुण्यात आले.

नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ते पुण्याचे महापौर

यानंतर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्यांनी 1993 च्या काळात राजकारणात प्रवेश केला. याच काळात मोहोळ माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांचा राजकारणात दबदबा निर्माण होण्यास सुरुवात झाली. 2002, 2007 आणि 2017 मध्ये कोथरुडमधून ते नगरसेवक राहिले आहेत. 2017 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पुढे दोन वर्षांनंतर त्यांना थेट पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी मिळाली. यानंतर पुढे कोरोनाचं संकट आलं. या संकटाच्या काळत मोहोळ यांनी उल्लेखनीय काम केलं.

जूनमध्ये खासदार अन् मंत्रिपदाची लॉटरी

मोहोळ यांनी स्मार्ट सिटी आणि पीएमपीचे निदेशक, पीएमआरडीएचे सद्स्याच्या रुपातही आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यानंतर भाजपने त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर होते. तसेच वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना तिकीट दिले होते. या तिरंगी लढतीत मोहोळांनी बाजी मारली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube