संयुक्त राष्ट्राचं मोठं पाऊल; Israel-Hamas War मध्ये बालहक्कांचं उल्लंघन झाल्याचा रिपोर्ट

संयुक्त राष्ट्राचं मोठं पाऊल;  Israel-Hamas War मध्ये बालहक्कांचं उल्लंघन झाल्याचा रिपोर्ट

Israel-Hamas War UNO take big step : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही ( Israel Hamas War ) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रौढ नागरिकांसह अनेक लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यावर आता संयुक्त राष्ट्राने ( UNO ) मोठं पाऊल उचलल आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव सुरक्षा परिषदेला आगामी वार्षिक रिपोर्टमध्ये इस्त्रायल आणि हा हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्ध दरम्यान जी लहान मुलं मारली गेली. त्यामुळे बाल हक्कांचं आणि सुरक्षेचा उल्लंघन झालं आहे. याची माहिती देणार आहेत.

मोहोळ यांचे नाव कन्फर्म : मोदींनी बोलावलेल्या नियोजित मंत्र्यांच्या बैठकीत दिसले

संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी माध्यमांना सांगितले की, महासचिव अँटोनियो गुटारेस त्यांच्या कार्यालयाचे प्रमुख कोर्टेनय रैट्रे यांनी इस्त्रायलच्या संयुक्त राष्ट्र राजदूत गिलाद एर्डन यांना फोन करून या रिपोर्टबाबत माहिती दिली. यावर इस्त्रायलने नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील माध्यमांमध्ये समोर आला आहे.

नारायण राणे, कराडांना डच्चू; फ्यूचर पॉलिटिक्स साधत ‘या’ नेत्यांना मंत्रिपदाची संधी

इस्त्रायली सैनिकांचा गाझामधील शाळेवर हल्ला…

हमासविरुद्धच्या युद्धादरम्यान इस्त्रायलने (Israel)शरणार्थी शिबिरावर हल्ला केला. गाझा (Gaza)येथील शाळेवर इस्रायली लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यात 32 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये 14 मुलं होती. हमास या शाळेत इतर ठिकाणाहून दहशतवादी कारवाया करत असल्यानं या शाळेवर हल्ला करण्यात आल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. या हल्ल्यात लहान मुलं आणि महिलांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी पॅलेस्टाईन न्यूज एजन्सीनं या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज