प्रतापराव विठ्ठलाच्या कृपेने मंत्री, आम्ही मोदींचे कृतज्ञ…; कुटुंबाने मानले मोदींचे आभार

प्रतापराव विठ्ठलाच्या कृपेने मंत्री, आम्ही मोदींचे कृतज्ञ…;  कुटुंबाने मानले मोदींचे आभार

Prataprao Jadhav : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचीही वर्णी लागल्याने त्यांच्या गावात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. विठ्ठलाच्या कृपेने प्रतावराव कॅबिनेट मंत्री झाले, आम्ही मोदीजींचे कृतज्ञ राहू, अशा भावना त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या.

खासदार म्हणून शपथविधीला आलो पण… मंत्रिपद मिळाल्याने मोहळांना अश्रू अनावर 

प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या चिन्हावर चौथ्यांदा तिसऱ्यादा खासदार म्हणून निवडून आले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते विदर्भातील एकमेव खासदार आहेत. त्यांच्या रुपाने बुलढाणा जिल्ह्याला तब्बल 22 वर्षांनंतर प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. काल (दि. 08 जून रोजी) खासदार जाधव यांना मंत्रिमंडळातील समावेशाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून संदेश मिळाला. त्यानुसार आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

चीनचा नेपाळमध्ये नवा उद्योग; ‘या’ प्रकल्पासाठी नेपाळ सरकारला फसवले? 

मंत्रिपद मिळेल असं स्वप्नातही वाटलं नाही…
दरम्यान, प्रतापराव जाधवांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला. जाधव यांचे काका यांनी आम्ही स्वप्नातही मंत्रीपद मिळेल याचा विचार केला नव्हता. प्रतापरांवांना मंत्रिपद मिळाल्याने आम्हा सगळ्यांना आनंद झाला. विठ्ठलाच्या कृपेने, मतदारांच्या आणि मोदीजींच्या आशिर्वादाने ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, आम्ही मोदींचे आणि विठ्ठलाचे कृतज्ञ राहू, असं सांगितलं.

पेढा भरवून स्वागत करेन…
तर मादणी सारख्या छोट्या गावात शेती करत, अडत दुकान चालवत आज प्रतावराव मंत्री झाले. आमच्यासाठीच नाही तर अख्या गावासाठी आणि मतदारसंघासाठी ही अभिमानाची बाब आहे. विठ्ठलाच्या आशिर्वादाने हे मंत्रिपद मिळालं. प्रतापराव मंत्रिपदाची शपथ घेऊन मतदारसंघात येतील तेव्हा त्यांना माझा मुलगा समजून हार घालेन अन् कुंकू लावून, पेढा भरवून स्वागत करेन, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रतापराव जाधव मंत्रिझाल्यानंतर जनतेची आणखी चांगली प्रकारे सेवा करतील, त्यांच्या कामाने पक्षाला आणि देशाला हेवा वाटेल, असा विश्वासही त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी व्यक्त केला.

कोण आहेत प्रतापराव जाधव?
प्रतापराव जाधव हे शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी बुलढाणा तालुक्यातील मेहकर येथे झाला. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सरपंच पदापासून सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत आमदारकी आणि खासदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. प्रतापराव जाधव यांनी 2009, 2014, 2019 आणि 2024 या सलग चार लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube