भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा

भुजबळांच्या लोकसभा उमेदवारीसंदर्भात राजकारण झालं; प्रफुल पटेलांचा खळबळजनक खुलासा

Praful Patel On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.  परंतु, हे झालं असलं तरी आम्ही सर्व लोक भुजबळ यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असंही ते यावेळी म्हणाले. तसंच, आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा सोडण्याबद्दल आग्रह केला त्यामुळे ती जागा सेनेला सोडावी लागली असंही पटेल यावेळी म्हणाले आहेत.

 

म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट

विधानसभेला खबरदारी

पुढे बोलताना पटेल म्हणाले, आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे आपल्या पक्षाला मजबूत करण्याची. महायुतीत आपण आहोत त्यामुळे त्या महायुतीला देखील मजबूत करण्याचं काम आपल आहे असही ते म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेसारखी परिस्थिती होणार नाही. त्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकाधिक जागा आपल्या वाट्याला येतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.

 

भुजबळ काय म्हणाले होते ?

छगन भुजबळ यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी उमेदवारी जाहीर करण्याला वेळ लावला असा अप्रत्यक्ष ठपका त्यांनी ठेवला होता. ते म्हणाले होते की, महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील तीन आठवड्यापासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढं गेला आहे. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या नाशिकच्या जागेवर महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे.  तसंच, मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असं छगन भुजबळ त्यावेळी म्हणाले होते.

 

गोडसेना उमेदवारी नंतर अभिनंदन

नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळ नाराज झाले अशी चर्चा होती. दरम्यान, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, ठीक आहे हेमंत गोडसे यांचं नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. असं भुजबळ म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube