निलेश लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी अन् विखेंचा करेक्ट कार्यक्रम; काकडेंकडून अनेक गुपिते उघडकीस

  • Written By: Published:
निलेश लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी अन् विखेंचा करेक्ट कार्यक्रम; काकडेंकडून अनेक गुपिते उघडकीस

Ahmednagar Lok Sabha Election Result Ncp spoke person Ankush Kakade Interview: अहमदनगर लोकसभा (Lok Sabha Election) मतदारसंघ शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या दोन निवडणुकीत प्रतिष्ठेचा केला होता. यंदा शरद पवार यांनी तुतारी चिन्हावर निलेश लंके (Nilesh Lanke) यांना दिल्लीत पाठवात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखेखे (Sujay Vikhe) यांना धक्का दिलाय. परंतु निलेश लंके यांना विजयी करण्यासाठी थेट आणि पडद्यामागे अनेक जण राबले आहेत. गेल्या सोळा वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक असलेले शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी लेट्सअप मराठीशी मुलाखत दिली. त्यात निलेश लंके यांची उमेदवारी कशी फायनल झाली. लंके यांना विजयी करण्यासाठी काय-काय केले याचे गुपितेही अंकुश काकडे यांनी उघड केले आहे.

रोहित पवार स्वत: BJPमध्ये जाऊन मंत्रीपद मिळण्यासाठी उत्सुक..; अजितदादा गटाच्या आमदाराचा दावा

अहमनगरची जागा जिंकण्याची शरद पवारांची खूप इच्छा होती. कारण 2009 पासून अनेकदा प्रयत्न करून ही जागा आम्हाला जिंकता येत नव्हती. परंतु यंदा ही जागा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न सुरू केले होते, असे काकडे म्हणाले. निलेश लंकेंची उमेदवारी कशी फायनल झाली याबाबत काकडे म्हणाले, पुणे विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध भाजपचा पॅनल अशी झाली. त्या निवडणुकीत निलेश लंके यांना समाविष्ट करण्यात आले होते. प्रचाराच्या निमित्ताने त्यांना अहमदनगरमधील सहाही विधानसभा मतदारसंघात फिरविण्यात आले. त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पण ते लोकसभा निवडणुकीत दिग्गजासमोर टिकतील की नाही, याबाबत पक्षात चर्चा होत होती. परंतु त्यांची जिद्द पाहता ते टिकतील, असे वाटत होते.

Devendra Fadnavis : राजीनाम्याचं काय झालं? फडणवीसांनी दिल्लीतील स्टोरी सूचक शब्दांत सांगितली

मोदी बागेत लंके-शरद पवारांची तब्बल दोन तास चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फडल्यानंतर लंके हे सत्तेत राहून कामे करून घेण्यासाठी अजित पवारांबरोबर राहिले. परंतु ते शरद पवारांविरोधात नव्हते. ते पवार हे दैवत असल्याचे सांगत होते. पक्षाच्या बैठक असताना त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात यायचे ते लंकेंना तिकीट द्या, अशी मागणीही करायचे. लोकसभेसाठी आमदार रोहित पवार व प्राजक्त तनपुरे या दोघांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी कुणी उमेदवार नसेल तर मी उमेदवारी करेल, असे पक्षाला सांगितले. प्रताप ढाकणेही इच्छूक होते. लंकेंचे कार्येकर्ते आम्हाला विश्वास द्यायचे की लंके हे तुमच्याकडील येतील, त्यांना उमेदवारी द्या. परंतु आम्हाला त्यावर विश्वास बसत नव्हता. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर, मी तिघांची बैठक झाली. निलेश लंके यांच्याशी बोलणेही झाले. तुझे कार्यकर्ते बैठकीला येतात. पण तू पत्ते खुले करत नाही, काय मनात आहे ते एकदा शरद पवारांच्या कानावर घाल, असे आम्ही तिघांना लंकेंना सांगितले. सिल्व्हर ओक आणि चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात पवारांबरोबर बैठक नको, असे लंकेंनी सांगितले होते. शेवटी मोदी बागेतील निवासस्थानी लंके व शरद पवार यांची बैठक झाली. तब्बल पावणे दोन तास चर्चा झाली असल्याचे काकडे यांनी सांगितले.


तोपर्यंत उमेदवार न देण्याचा शब्द पवारांनी पाळला !

पावणेदोन तासाच्या चर्चेत लंकेंच्या डोळ्यात दोनदा पाणी आले होते. मी तुमच्यापासून दूर गेल्याने व्यथित झालो, असे लंके हे पवारांना म्हणाले. अजित पवार यांनी डिसेंबर महिन्यात दोनशे कोटी रुपयांचे कामे मंजूर करण्याचा शब्द दिला होता. पण प्रामाणिकपणे मी तुमच्याबरोबर राहणार आहे. अधिवेशन झाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे सांगितले. शरद पवारांनी दुसऱ्या उमेदवार तोपर्यंत न देण्याचा शब्द पाळला होता. डिसेंबर महिन्यात साहेबांच्या (शरद पवार) वाढदिवसानिमित्त अत्याधुनिक अम्बुलन्सचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते लंके यांना करायचे होते. परंतु साहेबांनी नकार दिला. माझ्या हस्ते उद्घाटन करू नको, समोरची मंडळी अलर्ट होतील, असे शरद पवारांनी लंकेंना सांगितले. त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर लंके आमच्या पक्षात आल्याचे गुपित काकडे यांनी उघडकीस आणले.

निलेश लंकेंनाच सर्वाधिक मदत
शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात लक्ष दिले नसेल, त्याच्यापेक्षा जास्त अहमदनगरमध्ये लक्ष दिले आहे. दहा उमेदवारांपेक्षा सगळ्यात जास्त मदत निलेश लंके यांना केली आहे. मी, राजेंद्र फाळके, दादाभाऊ कळमकर प्रवीण गायकवाड तेही या गोष्टीचे साक्षीदार आहे. शरद पवारही फिल्डवरून माहिती घेत होते. कुठे कमी पडतो काय, काय सुरू आहे याची माहिती स्वतः पवारांनी सांगितले. सुदैवाने विखेंबरोबर असलेली काही मंडळी साहेबांसाठी फिडबॅक द्यायचे. त्यामुळे करेक्ट कार्यक्रम विखेंचा आम्ही करायचा आहे. विखेंना पराभव करायचा नव्हता तर माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून द्यायचा आहे, अशी भूमिका पवारांची होती, असे काकडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज