शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो; जयंत पाटलांचं विधान

शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो; जयंत पाटलांचं विधान

Jayant Patil PC :  लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) महायुतीला मोठा धक्का दिला. महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही 10 पैकी 8 जागांवर विजय मिळवला. दरम्यान, आज पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटलांनी (Jayant Patil) शरद पवार (Sharad Pawar) जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असं म्हटलं.

नवीन ट्विस्ट? राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘RSS मोदींना पर्याय शोधतेय’ 

नव्यानेच खासदार झालेल्या सर्व उमदेवारांची आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी बजरंग सोनवणेंसह सर्वच खासदार मुंबईत आले होते. त्यावेळी बोलतांना पाटलांनी शरद पवार गटाच्या निवडून आलेल्या खासदारांचे अभिनंदन केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही मोठे यश मिळालं. महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकत्र काम केल्याने महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार यांनी मेहनत घेतली, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभांमुळे महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले, असेही जयंत पाटील म्हणाले.

अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’ 

ते म्हणाले, केंद्र सरकारपेक्षा महाराष्ट्र सरकारवर जास्त लोकांची जास्त नाराजी होती,असं आमच्या सर्वेक्षणात समोर आलं. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राचे आहे. विधानसभा निवडणुकीत मविआला जास्त जागा मिळतील, असा विश्वास वाटतो. GST, महागाई, बरोजगारीला जनता कंटाळली होती. काँग्रेस सरकारच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. तसेच आम्हाला जे यश मिळाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो असेही जयंत पाटील म्हणाले.

आमची बरीच मते पिपाणीला गेली – पाटील
आमची बरीच मते पिपाणीला गेली आहे. सर्वच उमेदवारांना मिळणारी सरासरी पंचेचाळीस ते पन्नास हजार मते पिपाणी गेलीत. दिंडोरीमध्ये एक लाखाहून अधिक मते पिपाणीला गेली, पिपाणीचे नाव तुतारी असल्यानेलोकांचा गैरसमज झाला. आम्ही यावर आक्षेप घेणार आहोत. पिपाणीला साताऱ्यात मतदान गेले. त्यामुळं तिथं आम्हाला फटका बसला. हे बाब आम्ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं पाटील म्हणाले.

नगरमध्ये होणार वर्धापन दिन
पुढं बोलतांना ते म्हणाले, लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये पक्षाच्या वर्किंग कमिटीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन 10 जून रोजी अहमदनगरमध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जाहीर सभेचेही आयोजन करण्यात येणार असल्याचं पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube