अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’

अजितदादांचे आमदार परतणार का? जयंत पाटलांनी एकाच वाक्यात सांगितल, ‘माझा मोबाईलचा वापर….’

Jayant Patil PC : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीत बंडाळी करून बाहेर पडलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला 4 पैकी केवळ 1 जागा जिंकता आली आहे. त्यामुळं अजित पवा गटाचे आमदार धास्तावले असून ते शरद पवार गटात गटात परतणार असल्याची चर्चा सुरू झाली. याविषयी आता खुद्द प्रदेधाध्यक्ष जयंत पाटलांना (Jayant Patil) भाष्य केलं.

Kangana Ranaut: CISF गार्डने कंगनाच्या कानशिलात लगावली? चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? 

नव्यानेच खासदार झालेल्या सर्व उमदेवारांची आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी बजरंग सोनवणेंसह सर्वच खासदार मुंबईत आले होते. त्यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, शरद पवार गटाच्या निवडून आलेल्या खासदारांचे अभिनंदन. महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मोठे यश मिळालं. मविआच्या सर्वच घटक पक्षांनी चांगलं काम केलं. त्यामुळे महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या. पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या सभांमुळं महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

Siddharth P Malhotra: दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यांनी ‘महाराज’ सिनेमाच्या लेखकांच केलं कौतुक, म्हणाले… 

ते म्हणाले, आमचे खासदार दिल्लीत महाराष्ट्राचा प्रश्न मांडतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करणार आहे. आमचे खासदार जनतेच्या बाजूने लढण्याचे काम करतील.

यावेळी पत्रकारांनी आमदार परत शरद पवार गटात परतणार असल्याच्या चर्चांविषयी विचारले असता जयंत पाटलांनी एकाच वाक्यात विषय संपवला आहे. सध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढंचं तुम्हाला सांगतो, असं पाटील म्हणाले.

ते म्हणाले, आम्ही आत्ताच यावर काही भाष्य करणार नाही. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तिकडे गेलेल्या नेत्यांचा आणि आमदारांचा मनस्थिती बदलली आहे. पण थोडा वेळ जाऊ द्या, महाराष्ट्रातील जनतेच्या मताची आम्हाला खूप काळजी आहे. आमचे अनेक आमदार सोडून गेले, पण आज जनतेने लोकसभा निवडणुकीत आमच्या बाजूने निकाल दिला. आम्ही योग्य वेळी योग्य ते करू, असं पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज