जयंत पाटलांना काँग्रेसमध्ये घेणार का? पटोलेंनी सूचक शब्दांत दिले मोठे संकेत
Nana Patole : राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं आहे. राज्यात कुणाची सरशी होणार याचं उत्तर चार जूनला मिळेलं. मात्र राज्यात नेतेमंडळींचे दावे प्रतिदावे सुरुच आहेत. निकालानंतर कोण कुठल्या पक्षात जाणार याच्या खुमासदार चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी अजित पवार गट फुटणार असल्याचं विधान केलं होतं. त्याला प्रत्यूत्तर म्हणून अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी चार जूननंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा केला होता. यामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही उडी घेतली होती. या दाव्यांवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आली नसली तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र मोठं वक्तव्य केलं आहे.
पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना जयंत पाटील काँग्रेसमध्ये आले तर घेणार का, असा सवाल विचारला. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट राहणार का हा खरा प्रश्न आहे. देशभरातून काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अशाच घडामोडी पाहण्यास मिळतील. देशात परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू अशा सूचक शब्दांत पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?