Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा  ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभा मतदारसंघात (Wardha Lok Sabha Constituency) दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले. त्यानंतर आता मतमोजणीची सर्वांना उत्कंठा लागलीये. मतदान आटोपताच रिंगणातील प्रमुख उमेदवारांनी जय आणि पराजयाचे दावे ठोकणं सुरू केलं. गावोगावी विश्लेषण सुरू झालं. विजयाचे आडाखे बांधले जात आहेत. दरम्यान, आजवर विरोधकांना धोबीपछाड करणारे रामदास तड (Ramdas Tadas) या निवडणुकीतीही विरोधी उमदेवाराला पराभूत करून विजयाची हॅट्रीक मारणार का? हे 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे

…अन् भर मंचावर मंत्री विखेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी 

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण वर्धा नावाच्या अवती – भगती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचे वलय आहे. वर्धा ही महात्मा गांधींची कर्मभूमी आहे. यंदा वर्धा लोकसभा मतदार संघात महायुतीचे रामदास तडस, महाविकास आघाडीचे अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. राजेंद्र साळुखे आणि बहुजन समाज पार्टीचे डॉ. मोहन राईकवार यांच्यासह २४ उमेदवार रिंगणात होते. असे असले तरीही महायुतीचे रामदास तडस आणि महाविकास आघाडीचे अमर काळे यांच्यातच थेट लढत राहिली आहे.

Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी 

वर्धा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला…
वर्धा मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. श्रीराम नारायण अग्रवाल प्रथम येथून खासदार झाले होते. त्यांच्यानंतर काँग्रेसचे कमल नयन बजाज यांनी सलग तीन वेळा म्हणजे 15 वर्षे लोकसभेत या मतदारसंघांच प्रतिनिधित्व केले. त्यानंतरही जगजीवनराव कदम, संतोषराव गाडे, वसंत साठे हे काँग्रेसचे खासदार राहिले. साठे हे देखील तीन टर्म खासदार होते. त्यानंतर माकप आणि भाजपनं एक एक टर्म अशी दहा वर्ष हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला होता. मात्र दत्ता मेघे यांनी पुन्हा काँग्रेसला ही जागा जिंकून दिली. यानंतर काँग्रेसच्या प्रभा राव येथून खासदार झाल्या. 2004 मध्ये भाजपने येथे पुन्हा विजय मिळवला. 2009 मध्ये दत्ता मेघे यांनी ही जागा पुन्हा भाजपकडून हिसकावून घेत काँग्रेसचा झेंडा फडकवला.

लाखांच्या मतांनी तडस दोन टर्म खासदार
त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये रामदास तडस यांनी भाजपला येथे विजय मिळवून दिला होता. 2014 च्या निवडणुकीत तडस यांनी वर्ध्यातून काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2,15,783 मतांनी पराभव केला होता. 2019 मध्ये काँग्रेसने प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता.

वर्ध्यात भाजपची ताकद सर्वाधिक

वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि देवळी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघही वर्धा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात. वर्धा जिल्ह्यातील 4 पैकी 3 जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. फक्त देवळी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात देवेंद्र भूयार हे आमदार आहेत. ते स्वाभिमानी पक्षाचे आहेत. धामणगाव रेल्वेमध्ये भाजपचे प्रताप अडसड आमदार आहेत. थोडक्यात या मतदारसंघातील सहा क्षेत्रांपैकी चार क्षेत्रांमध्ये भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे वर्ध्यात भाजपचे वर्चस्व चांगले आहे. जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांनी तडस यांचा कंबर कसून प्रचार केला. याचा फायदा तडसांना होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

तेली-कुणबींचे प्राबल्य तडसांना तारणार?
वर्ध्याचा विचार करता सर्व समाजाचे संमिश्र प्रतिनिधित्व येथे पाहायला मिळते. मात्र या मतदारसंघात प्रामुख्याने तेली आणि कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत. त्यामुळं साहजिकत तेली समाजाची मते तडसांना मिळणार, यात शंका नाही. दुसरं असं की, विदर्भातील कुणबी हा ओबीसीमध्ये येतो आणि ओबीसी ही भाजपची व्होटबॅंक आहे. ही मतेही तडसांच्या पारड्यात जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे

दलित – मुस्लिमांचे मते काळेंकडे जाणार
दलित, आदिवासी आणि मुस्लिम लोकसंख्याही येथे निर्णायक ठरू शकते. कारण या समाजातील मतदारांच्या मनात भाजपविषयी रोष आहे. त्याचा फायदा अमर काळेंना होऊ शकतो. शिवाय, शेतकरी, मजूर, कष्टकरी वर्गही भाजपच्या धोरणांना कंटाळला आहे. त्यामुळं ही मतेही काळेंकडे वळतील, असं बोलल्या जातं.

भाजपविरोधी वातावरणाचा काळेंना होणार फायदा
तडस हे यापूर्वीही दोनदा खासदार राहिलेले आहेत. त्याआधी ते आमदारही होते. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात जनसंपर्क चांगला आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट नाही. आणि वातावरण भाजपविरोधी आहे. त्याचा फटका तडसांना बसून अमर काळेंचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. शिवाय, अमर काळेंची पक्ष आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा, मोठा जनसंपर्क ह्या देखील काळेंच्या जमेच्या बाजू आहे.

सुनेने केलेल्या आरोपांचा तडसांना फटका
पूजा तडस यांनी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पती आणि सासरच्या लोकांवर कौटुंबिक अत्याचार केल्याचे आरोप केल होते. आपली कर्म कहाणी त्यांनी माध्यमांसमोर उघड केली होती. त्यांच्या या प्रयत्नात सुषमा अंधारे यांनीही हातभार लावला होता. त्यामुळं रामदासतडस यांची प्रतिमा खराब झाली. याचाही थोडा फार फडका तडसांना बसणार असल्याची चर्चा आहे.

…म्हणून काळेंच्या विजयाची शक्यता
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत वर्धा मतदारसंघात काँग्रेसचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता. मुळात काळे हेच एकेकाळी कॉंग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. त्यामुळं कॉंग्रेसची ताकद त्यांच्यासोबत आहे. शिवाय ते शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमदेवार असल्यानं राष्ट्रवादीच्या मतेही त्यांच्या पारड्यात पडणार असल्यानं काळेंचा विजय पक्का असल्याचं बोलल्या जातं आहे.

वाढीव मतदानाचा लाभ कुणाला?
वर्धा लोकसभेत मतदारराजा उदार झाला आणि त्यांनी भरभरून मताचे ‘दान’ केले. वर्धा लोकसभा क्षेत्रात 64.85 टक्के मतदानाचा टप्पा गाठला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.67 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे वाढत्या मतदानामुळे उमेदवारांमध्येही धकडी भरली आहे. या वाढीव मतदानाचा लाभ कुणाला झाला, हे अद्याप गुपीत आहे. त्यामुळे ‘कमळ’ उमलणार की ‘तुतारी’ वाजणार, हा प्रश्न कायम आहे. नेमके काय झाले ते 4 जूनलाच कळणार आहे.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज