विदर्भ-मराठवाड्यातील उमेदवारांचे भवितव्य उद्या होणार ईव्हीएममध्ये बंद, कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती?

विदर्भ-मराठवाड्यातील उमेदवारांचे भवितव्य उद्या होणार ईव्हीएममध्ये बंद, कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या (26 एप्रिल)मतदान होत आहे. तत्पूर्वी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात देशातील तब्बल 89 मतदारसंघात मतदान होणार आहे. राज्यातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांचा समावेश आहे.

Heera Mandi निमित्त दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसाठी अमृताची खास पोस्ट 

उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलडाणा, अकोला आणि वर्धा या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जागांसाठीही उद्याच मतदान होणार आहे. शांततेत मतदान व्हावे यासाठी देशभरात यंत्रणा सज्ज झाली आहे. अनेक मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला.

Lata Deenanath Mangeshkar Award सोहळ्याचे काही खास क्षण; पाहा फोटो… 

अकोल्यात तिहेरी लढत

महाविकास आघाडीशी जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अनेक मतदारसंघात आपले उमेदवार केले. ते स्वत: अकोल्यातून लोकसभा लढवत आहे. त्यामुळं उद्या अकोला मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष लागले आहे. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होणार आहे.

अमरावतीत दिनेश बूब देणार राणांना धक्का ?
गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आणि त्यानंतर भाजपमध्ये दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर प्रहारचे अध्यक्ष असलेल्या बच्चू कडूंनी त्यांच्यासमोर दिनेश बूब यांना उमेदवारी देऊन तगडं आव्हान निर्माण केलं. तर कॉंग्रेस कडून बळवंत वानखडेही रिंगणात आहेत.

यवतमाळ-वाशीमकॉंटे की टक्कर
यवतमाळ-वाशीममधून सलग पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांचे तिकीट शिंदे गटाने रद्द केले. त्यांच्या जागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी द्यावी लागली. या जागेवर राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यात थेट लढत आहे.

वर्ध्यात रामदास तडस हॅट्रिक करणार?
वर्ध्यात भाजपचे खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्यात लढत आहे. तडस यांना पुन्हा भाजपने खासदारकीची हॅट्ट्रिक करण्याचाी संधी दिली. तर अमर काळे हे चार वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले शरद काळे यांचे पुत्र आहेत.

बुलढाण्यात तुपकरांना वाढवलं शिंदे-ठाकरेंचं टेन्शन
बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून या मतदारसंघात जागेवर निवडणूक लढवत आहेत. तुपकर यांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढली आहे.

नांदेडमध्ये चिखलीकर विरुध्द चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले चव्हाण काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या जाण्यानं नांदेड कॉग्रेसमध्ये पोकळी तयार झाली. नांदेडमध्ये भाजपने विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत आहे.

जानकर जाधवांची हॅट्रिक रोखणार
परभणी मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हॅट्ट्रिक करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून महायुतीने रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे.

बबनराव कदम कोहळीकरांसमोर नागेश आष्टीकराचं आव्हानं
हेमंत पाटील यांची हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली. त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळ लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याने त्यांचे बंड शमले. शिंदे यांनी बबनराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीतून उमेदवारी दिली. ठाकरे गटाकडून या पदासाठी नागेश आष्टीकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज