‘All Eyes on Rafah’ नंतर ‘All Eyes on Nitish’ सोशल मीडियावर होत आहे ट्रेंड, ‘हे’ आहे कारण

‘All Eyes on Rafah’ नंतर ‘All Eyes on Nitish’ सोशल मीडियावर होत आहे ट्रेंड, ‘हे’ आहे कारण

All Eyes on Nitish : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर झाल्यानंतर देशात आता संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलेली आहे. एनडीएला (NDA) बहुमत मिळाला आहे मात्र भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीत 240 जागा जिंकले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सरकार बनवण्यासाठी भाजपला एनडीएच्या इतर घटक पक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे.

तर दुसरीकडे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी नितीश कुमार (Nitish Kumar) आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांचा पाठिंबा आवश्यक आहे. यामुळेच आता सोशल मीडियावर (Social Media) अनेक मिम्स व्हायरल होत आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘All Eyes on Nitish’ होय. नितीशकुमार कधीही बाजू बदलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे ‘All Eyes on Nitish’ हा ट्रेंड सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे.

#nitishkumar X वर ट्रेंड होत आहे

निकाल जाहीर झाल्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल #nitishkumar X वर खूप ट्रेंड करत आहे, आतापर्यंत या हॅशटॅगसह प्लॅटफॉर्मवर 152000 पोस्ट केल्या गेल्या आहेत. याशिवाय निवडणुकीशी संबंधित अनेक हॅशटॅगही ट्रेंड करत आहेत. जिथे #LokSabhaElections2024 वर एकूण 13900 पोस्ट करण्यात आल्या आहेत, #NDA_government_is_ready वर 51600 पोस्ट आणि #ChandrababuNaidu वर 140000 पोस्ट करण्यात आल्या आहेत.

तर #PaltJao वर 16.8 हजार आणि #YogiAdityanath यांच्यावर 20.7 हजार पोस्ट करण्यात आल्या आहेतयाशिवाय, अशा अनेक मीम्स X वर शेअर केले गेले आहेत, जे ही परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे दाखवतात.

इंस्टाग्रामवरही चर्चा

इंस्टाग्राम सोबतच #nitishkumar खूप ट्रेंड करत आहे. जिथे नितीश कुमार यांच्यावर 243000 पोस्ट करण्यात आल्या आहेत. तर #nitish वर 44700 पोस्ट करण्यात आल्या आहेत.

राज्यातील घडामोडींना वेग.. सरकार बरखास्त होण्याची शक्यता…, महायुती फुटीच्या उंबरठ्यावर

याशिवाय ‘ All Eyes on Rafah ‘ची पोस्ट एडिट करून आणि ‘ All Eyes on Nitish’ची पोस्ट आणि स्टोरी अनेकजण शेअर करत आहे. यासोबतच #loksabha सोबत 361000 पोस्ट देखील करण्यात आल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube