Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ अभिनेत्री कंगना निवडणुकीच्या रणात चमकणार! मंडी लोकसभा मतदार संघात आघाडीवर

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ अभिनेत्री कंगना निवडणुकीच्या रणात चमकणार! मंडी लोकसभा मतदार संघात आघाडीवर

Kangana Ranaut Lok Sabha Election Results 2024: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. (Himachal Pradesh) ही सीट कंगनामुळे खूप जोरदार चर्चेत आहे. (Lok Sabha Election 2024) कंगना रणौत सध्या मंडी जागेवर 13 हजार मतांनी आघाडीवर आहे. त्यांची लढत काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य यांच्याशी आहे. आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर ती जिंकली तर ती तिच्या फिल्मी करिअरमधून निवृत्त होईल.

कंगना पहिल्यांदाच राजकारणात हात आजमावत आहे. आपल्या स्पष्टवक्ते भाषणामुळे चर्चेत असलेल्या कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर ती निवडणूक जिंकली तर ती तिच्या फिल्मी करिअरला अलविदा म्हणू शकते, कारण तिला एका कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कंगनाला विचारण्यात आले की ती चित्रपट आणि राजकारण एकत्र कसे सांभाळेल, ज्यावर तिने थेटच सागितलं आहे. ‘मी चित्रपटांमध्ये गुंतलेली आहे, मी भूमिका करते आणि दिग्दर्शनही करते. राजकारणात लोक माझ्यासोबत येण्याची शक्यता दिसली, तरच मी राजकारण करेन. मला फक्त एकच गोष्ट करायची आहे. कंगनाच्या या विधानानंतर असे मानले जात आहे की जर ती निवडणूक जिंकली तर ती चित्रपट जगताला अलविदा म्हणू शकते.

Satara Loksabha : उदयनराजेंनी वचपा काढलाच! शशिकांत शिंदेंना धूळ चारली, विजयानंतर भावूक

कंगनाला पद्मश्री, 4 राष्ट्रीय आणि 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले

कंगनाने आतापर्यंत 42 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2020 मध्ये त्यांनी मणिकर्णिका फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊसही सुरू केले. पद्मश्री, 4 राष्ट्रीय पुरस्कार आणि 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. कंगना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर कंगना 12वी पास असून तिच्याकडे 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube