वंचित बहुजन आघाडी’चा सफाया! तब्बल 36 लोकसभा मतदारसंघात ‘डिपॉझिट जप्त’

वंचित बहुजन आघाडी’चा सफाया! तब्बल 36 लोकसभा मतदारसंघात ‘डिपॉझिट जप्त’

Vanchit Bahujan Aghadi : लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये भाजप बहुमतापर्यंत पोहचू शकला नाही. तर इंडिया आघाडीने मोठी बाजी मारली आहे. मात्र, संख्याबळ नसल्याने तुर्तास त्यांनी सरकार स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं होत ते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या भूमिकेकडे. ते काय भूमिका घेतात याकडे. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत अनेकदा चर्चा केली. ते महाविकास आघीडसोबत जातील अशी परिस्थिती निर्माणही झाली होती. मात्र, त्यांनी जास्त जागांची मागणी केल्याने शेवटी ही चर्चा काही सफल झाली नाही. (Vanchit Bahujan Aghadi) परिणामी आंबेडकर वेगळं लढले. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 38 लोकसभा मतदारसंघापैकी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला तब्बल 36 लोकसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारांनीही प्रकाश आंबेडकरांची साथ सोडल्याचं समोर आलं आहे.

प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर  Lok Sabha elections : प्रकाश आंबेडकरच्या‘वंचित’ला मतदारांनी का नाकारले?

लोकसभेला ज्या 38 जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढला. त्यामध्ये पक्षाला फक्त 15 लाख 66 हजार 949 मतदान मिळाले आहेत. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा दारूण पराभव झाला. 2,76,747 मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. दरम्यान, अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान मिळालं. प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि अत्यंत अल्पसंख्याकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसतय. राज्यात फक्त अकोला आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसला आहे. बाकी ठिकाणी कुठही तसा फटका बसल्याचं चित्र नाही. 2019 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितमूळे जवळपास 15 मतदारसंघात फटका बसला होता.

अकोल्यात सलग पाचवा पराभव वंचित ने कॉंग्रेसचा घात केला, अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा दणदणीत विजय

वंचित बहुजन आघाडीचा चार जागांवर मविआला फटका बसला. मुंबई उत्तर पश्चिम, अकोला, हातकणंगले आणि बुलढाणा. मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला जिथे वंचितच्या परमेश्वर रणशुर यांना 10052 मतं घेतली. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे यांचा 40626 मतांनी विजय मिळाला. जिथे तिसऱ्या क्रमांकावरील प्रकाश आंबेडकरांना 2,76,748 मते घेतली. हातकणंगलेत ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव झाला जिथे वंचितच्या डी.सी.पाटील यांना 32,696 मतं मिळाली. बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव झाला. वंचितच्या वसंतराव मगर यांना 98,441 मतं मिळाली आहेत. महत्वाचं म्हणजे, अकोल्यात काँग्रेसचा सलग पाचवा पराभव आहे. या पाचही वेळी काँग्रेसचा पराभव जेवढ्या मतांनी झाला, त्यापेक्षा अधिक मतं प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहेत. त्यामुळे इथे आंबेडकर आणि भाजप यांच्या सेटलमेंटची चर्चा असते. इथली जिल्हा परिषद आणि महापालिका वंचितकडे, तर खासदारकी भाजपकडे असं गणित असल्याचंही उघड-उघड बोलले जातं.

2024 मधील लोकसभेत वंचितची स्थिती.

  • एकूण लढवलेल्या जागा : 38
  • मिळालेली मते : 15 लाख 66 हजार 949
  • इतरांना पाठिंबा दिलेल्या जागा : 07
  • उमेदवार नसलेल्या जागा : 03
  • वंचितने निवडणुकीत काय केलं आणि काय मिळवलं?

वंचितनं पाठिंबा दिलेले उमेदवार आणि त्यांचा निकाल

  • कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – विजयी
  • बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार) – विजयी
  • सांगली – विशाल पाटील (अपक्ष) – विजयी
  • नागपूर – विकास ठाकरे (काँग्रेस) – पराभूत
  • भिवंडी – निलेश सांबरे (अपक्ष) – पराभूत
  • अमरावती – आनंदराज आंबेडकर (रिपब्लिक सेना) – पराभूत
  • यवतमाळ-वाशिम – डॉ. अनिल राठोड (एसजेपी) – पराभूत

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज